Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Sarkarnama
विदर्भ

आम आदमीचे लक्ष्य महाराष्ट्र; विदर्भातील 'बडा' नेता पंजाबमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्ली, पंजाबनंतर आता आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचे धोरण आक्रमकपणे राबवायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) लढविण्याचे घोषित केल्यानंतर 'आप' महाराष्ट्रातील एक बड्या नेत्याला लवकरच राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. हा बडा नेता विदर्भातील आणि त्यातही उद्योगपती, राजकारणाचा दीर्घ अनुभव असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पाय रोवणार?

मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करुनही ‘आप’ला महाराष्ट्रात पाया रोवता आलेले नाहीत. परंतु आता एका माजी खासदाराला राज्यसभेत पाठविल्याने महाराष्ट्रात ‘आप’ची सकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते, असा विश्वास पक्ष प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाटतो. केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी नुकतीच या नेत्याची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

काल (गुरुवार) राज्यसभेच्या १५ राज्यातील ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात पंजाबमध्ये काँग्रेसच्या अंबिका सोनी आणि शिरोमणी अकाली दलाचे बलविंदर सिंग भुंदर यांची खासदारकीची मुदत संपत आहे. या दोन्ही जागा आता आम आदमी पक्षाकडे जाणार आहेत. त्यासाठी ‘आप’कडून ‘शक्तिशाली’ उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. याच शोधादरम्यान महाराष्ट्रातील एका नेत्याला आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्याची आम आदमीची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

आम आदमी पक्षाने दिल्लीपाठोपाठ पंजाब जिंकल्यानंतर त्याचा फायदा त्यांना राज्यसभेत झाला आहे. सध्या आम आदमीचे ८ खासदार राज्यसभेवर आहेत. यात दिल्लीतून ३ खासदारांची वर्णी लागली आहे. आपचे नेते संजय सिंग, श्रीनारायण दास गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता यांचा यामध्ये समावेश आहे. तर पंजाबमधून यापूर्वी ५ खासदार निवडून गेले आहेत. यात राघव चढ्ढा, हरभजन सिंग, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, संजीव अरोरा यांची वर्णी लागली आहे. १० जूननंतर या पक्षाचे दहा सदस्य राज्यसभेत असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT