रामदास कदमांचे शिवसेनेत जोरदार कमबॅक होणार! एकनाथ शिंदेचा 'खास' मेसेज

Ramdas Kadam | Shivsena : बाळासाहेबांच्या काळातील तुम्ही फायरब्रॅन्ड नेते आहात
Ramdas kadam News, Eknath Shinde News, Ramdas kadam Latest News in Marathi
Ramdas kadam News, Eknath Shinde News, Ramdas kadam Latest News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

खेड : मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेनेवर (Shivsena) नाराज असलेले, निवडणूक आणि पक्षीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दुर गेलेले शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas kadam) पुढच्या काहीच दिवसात पक्षात जोरदार कमबॅक करण्याची शक्यता आहे. काल खेड येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कदम यांना पक्षाच्या वतीने दिलेल्या खास मेसेजवरुन याबाबतचे संकेत मिळत आहेत. (Ramdas kadam Latest News in Marathi)

काल खेडमध्ये 'जागर कदम वंशाचा' या पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानाहून एकनाथ शिंदे बोलत होते. ते रामदास कदम यांना म्हणाले, "रामदास भाई तुम्ही आता केवळ साहित्यिक बनू नका, बाळासाहेबांच्या काळातील तुम्ही फायरब्रॅन्ड नेते आहात. तुमची आम्हाला, समाजाला आणि विधिमंडळातील युवा पिढीला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. तुम्ही डोक्यात काही ठेवू नका, सेकंड इनिंग जोरदार सुरू करा, तुम्ही पुन्हा सक्रिय व्हावे अशी आमची इच्छा आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Ramdas kadam News, Eknath Shinde News, Ramdas kadam Latest News in Marathi
हाजिर हो! दरेकरांना मुंबई पोलिसांकडून नोटीस

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ‘भाई तुम्ही आम्हाला ज्येष्ठ आहात. तुमच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही विधिमंडळात येत चला. आम्हाला तुमचा नेहमीच आधार वाटतो.’ कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार योगेश कदम असे सर्व जण वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते. या नेतेमंडळींसमोर एकनाथ शिंदे यांनी खास मेसेज दिल्याने रामदास कदम यांचे शिवसेनेत जोरदार कमबॅक निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.

Ramdas kadam News, Eknath Shinde News, Ramdas kadam Latest News in Marathi
कोल्हापूरात शिवसेनेची ‘टॉप टू बॉटम’ यंत्रणा कामाला; गड बांधणीसाठी ठाकरे-राऊत जिल्ह्यात

सभेचे निमंत्रण पण...

रामदास कदम म्हणाले, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला. मला १४ मे च्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणे आले आहे. पण या सभेला मी उपस्थित राहणार नाही. कारण, आमच्या ग्रामदैवतेच्या उत्सवाला मला उपस्थित राहवे लागणार आहे. मात्र, त्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com