Adani Power Nagpur, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Power Plant : मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यातही आता अदानींची 'पॉवर', दिवाळखोरीत निघालेला विद्युत प्रकल्प विकत घेतला

Adani Power Nagpur : अदानी आणि अंबानी या दोन उद्योजकांमध्ये नेहमीच औद्योगिक स्पर्धा सुरू असते. मिहान प्रकल्पात अंबांनी यांनी एव्हीएशन क्षेत्रात यापूर्वीच पाऊल ठेवले आहेत. विमानाच्या सुट्या भागांची निर्मिती अंबानींच्या कंपनी मार्फत केली जाते. आता त्यांचे स्पर्धकही नागपूरमध्ये येणार आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पातील टाटा एरबसचा प्रकल्प गुजरातने यापूर्वीच पळवला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News, 08 Jul : महिनाभरापूर्वीच अदानी फाउंडेशनने ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची आयुर्विज्ञान संस्था घेऊन नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला. आता अदानी पॉवर कंपनीने नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक परिसरातील दिवाळखोरीत निघालेला विदर्भ इंडस्ट्रिज पॉवर लिमिटेडचा औष्णिक विद्युत प्रकल्प विकत घेतला.

या प्रकल्पाची 600 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता आहे. अदानी पॉवरने 4 हजार कोटी रुपयांच्या मोबदल्यात हा प्रकल्प अधिग्रहित केला आहे. ही मुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात अदानींचे आगमन ही विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रातील मोठी घडामोड मानली जात आहे.

अदानी आणि अंबानी या दोन उद्योजकांमध्ये नेहमीच औद्योगिक स्पर्धा सुरू असते. मिहान प्रकल्पात अंबांनी यांनी एव्हीएशन क्षेत्रात यापूर्वीच पाऊल ठेवले आहेत. विमानाच्या सुट्या भागांची निर्मिती अंबानींच्या कंपनी मार्फत केली जाते. आता त्यांचे स्पर्धकही नागपूरमध्ये येणार आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पातील टाटा एरबसचा प्रकल्प गुजरातने यापूर्वीच पळवला आहे.

त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विरोधकांकडून नेहमीच टीका केली जाते. फडणवीस यांनी त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणण्याची घोषणा केली आहे. आता अदानी यांच्या रुपाने देशातील एक मोठा उद्योगपती नागपूरमध्ये गुंतवणूक करणार आहे. ही नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीने मोठी बाबा मानली जात आहे.

विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (VIL) कंपनीने मिहानमधील उद्योगकांना वीज पुरवठा करण्यासाठी औष्णिक विद्युत प्रकल्प सुरू केला होता. या कंपनीला एक कोळशाची खानही वितरित झाली होती. त्यानंतरही ही कंपनी विद्युत प्रकल्प सुरू करू शकली नाही. त्यामुळे ही कंपनीच दिवळाच दिवाळखोरीत निघाली होती.

18 जून 2025 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणच्या मुंबई खंडपीठाने अदानी पॉवर लिमिटेडच्या निराकरण योजनेला मंजुरी दिली. 600 मेगावॅट विद्युत निर्ती क्षमता असलेल्या प्रकल्पाची 18 हजार 500 मेगावॅटपर्यंत क्षमता वाढवण्याचा निर्णय अदानी कंपनीने घेतला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात पूर्वीपासूनच अदानी कंपनीच्यावतीने वीज निर्मिती केली जाते.

विशेष म्हणजे अदानी कंपनीच्या विद्युत मीटरच्या विरोधात मोठा रोष आहे. राज्य शासनाने हे मीटर लावणे आधी बंधनकारक केले होते. मात्र यास प्रचंड विरोध झाला. विधानसभा निवडणुकीच्या काळात बंधनकारक शब्द वगळण्यात आला असला तरी अदानी कंपनीचे कर्मचारी विद्युत मीटर लावण्यासाठी आग्रह करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT