Devendra Fadnavis, Ajit Pawar And Eknath Shinde sarkarnama
विदर्भ

Shivsena Politics : अजितदादांच्या पाठोपाठ आता शिंदेंची शिवसेनाही नागपुरात ‘डिक्लेरेशन' देणार

Eknath Shinde Shivsena Politics : महापालिका आणि जिल्हा परिषदेच्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केले आहेत. नेत्यांनी आता जिल्ह्यांचे दौऱ्यांवर भर देणं सुरू केलं आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच नागपूर दौरा करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चार्ज केले होते. त्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नागपूरला येत आहेत. बुधवारी (ता.24) शिवसेनेने निर्धार मेळावा आयोजित केला असून शिवसैनिकांना चार्ज केले जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूरमध्ये चिंतन शिबिर घेतले. यात नागपूर डिक्लेरेशन जाहीर करण्यात आले. या डिक्लेरेशनच्या माध्यमातून भाजपसोबत युती आणखी मजबूत करण्यात संकल्प करण्यात आला. पक्षाच्या अधिकृत जाहीरनाम्यात याचा समावेश करण्यात आला. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळीक अधिक घट्ट होत असल्याचे संकेत देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आता निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात येते. सर्वच नेते आम्ही एकत्रतच लढू असे जाहीरपणे सांगत आहे. मात्र स्थानिक पातळीवर वेगळीच चर्चा आहे. नागपूरमध्ये शिवसेनचे दोन नगरसेवक आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. ग्रामीणमध्य दोन्ही उद्धव यांचे दोन जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याकडे आले आहेत.

मात्र जिल्हा परिषदेची पाटीलकी अद्याप रिकामीच आहे. त्यामुळे महायुतीत किती जागा सोडल्या जातील याची शिवसेनेलाच खात्री नाही. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दोनचार जागेवर तडजोड केल्यास फाटफूट होण्याची भीती शिवसैनिकांना आहे.

सध्या शिवसेनेने आपली कवाडे सर्वांसाठी खुली केली आहे. आभार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश प्रवेश केला आहे. काही माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. मात्र ते सक्रिय झाल्याचे दिसत नाही. हे बघता निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT