Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जळगावात प्रशासनाला धडकी भरवणारा आक्रोश मोर्चा; फडणवीसांना दिला इशारा

Shiv Sena agitation news 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन तातडीने पाळावे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे. यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे जळगावला गुरुवारी(ता.18) मोठे शक्तिप्रदर्शन झाले.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackrey News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर जळगावला आक्रोश मोर्चा झाला. या मोर्चात माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेने संतापले. मोर्चात राडा करत शेतकऱ्यांनी गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन तातडीने पाळावे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे. यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे जळगावला गुरुवारी(ता.18) मोठे शक्तिप्रदर्शन झाले.

माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला. यामध्ये प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस देखील सहभागी झाली होती. या मोर्चाला केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मोर्चा कार्यालयावर आल्यावर माजी खासदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यास मोर्चा स्थळी यावे अशी मागणी केली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम नकार दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या नकारामुळे शेतकरी संतप्त होत घोषणा देऊ लागले.

Shivsena UBT News
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; हैदराबाद गॅझेटवरील टांगती तलवार दूर; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

यावेळी आक्रमक झालेल्या माजी खासदार पाटील तसेच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांनी प्रवेशद्वारावर यावे असा हट्ट धरला. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी गेट बंद केल्याने शेतकऱ्यांनी गेटला धक्के देत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. जय जवान जय किसान यासह विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आभार दुमदुमले.

पोलिसांनी अडकाठी आणूनही आमदार बच्चू कडू तसेच शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार उमेश पाटील, काँग्रेसचे प्रदीप पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक लाड वंजारी, डॉक्टर संग्राम सूर्यवंशी, माजी महापौर कुलभूषण पाटील आदींसह विविध शेतकरी आणि पदाधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात अक्षरशः घुसले. त्यानंतर निवेदन देऊन ते बाहेर पडले.

Shivsena UBT News
Jalgaon Politics : जळगावला शेतकरी मोर्चात जोरदार राडा; आंदोलक गेट तोडून कलेक्टर ऑफिसमध्ये शिरले

आजच्या मोर्चानं जळगाव शहरात नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. जळगाव मध्ये सर्व 11 आमदार, दोन खासदार आणि तीन मंत्री सत्ताधारी पक्षाचे आहेत. केळी उत्पादक संकटात असताना यातील कोणीही मदतीला आला नाही. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकू नये असे सत्ताधाऱ्यांना वाटते. त्याचा आम्ही निषेध करतो, असे माजी खासदार उमेश पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com