Eknath Shinde and Amol Mitkari
Eknath Shinde and Amol Mitkari  Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari : मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावताच मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी; सभागृहात नेमकं काय घडलं?

सरकारनामा ब्यूरो

Amol Mitkari News : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून हे अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजत आहे. त्यामध्ये भूखंड विक्री, गायरान जमीन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न असे अनेक मुद्दे गाजले.

असे असतानाच आज विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रावण असा उल्लेख केल्यामुळे सभागृहात पुन्हा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांना चांगलंच सुनावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत मिटकरींनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली.

देशाच्या पंतप्रधानांबाबत असं बोलणं ही संसदीय संस्कृती नाही. आपण काय बोलतोय याचं भान आपण ठेवलं पाहिजे. सभागृहाचे पावित्र्य आपण ठेवले पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

अमोल मिटकरी हे पंढरपूर कॉरिडोअरचा विषय सभागृहात मांडत होते. यावेळी त्यांनी ट्विट वाचताना मोदींचा रावण असा उल्लेख केला. त्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधी बोलताना तारतम्य बागळलं पाहिजे, अशा शब्दांत मिटकरींना सुनावलं.

त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी यामध्ये हस्तक्षेप करत अमोल मिटकरी यांनी केलेले पंतप्रधानांबाबतचे विधान पटलावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

तसेच देशाच्या पंतप्रधानांबाबत बोलताना आपण विचारपू्र्वक बोललं पाहिजे, असं मत निलम गोऱ्हे यांनी बोलून दाखवलं. त्यानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या विधानाबाबत अखेर दिलगिरी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT