Winter Session : तुम्ही अजून सहकार खात्यात रुळला नाहीत ; पवारांनी पुन्हा सावेंना सुनावले..

Nagpur : विनायकराव पाटील हे तुमच्याच जिल्ह्यातील नेते सहकारमंत्री होते. त्यांनी हे खाते खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते.
Ajit Pawar- Atul Save News, Aurangabad
Ajit Pawar- Atul Save News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar : हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांना चिमटा काढल्यानंतर आज पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर बोलतांना पुन्हा अजित पवारांनी (Ajit Pawar) सुनावले. सहा महिने झाले तरी अजून तुम्ही सहकार खात्यात रुळला नाहीत, काहीही काम घेवून गेलो की ते म्हणतात देवेंद्रजींना फोन करून विचारतो. अहो त्यांना किती त्रास देणार, असा टोला देखील लगावला.

Ajit Pawar- Atul Save News, Aurangabad
Anil Deshmukh News : मोठी बातमी! अनिल देशमुखांना दिलासा: उद्या तुरुंगातून बाहेर येणार

विधानसभेत आणि विधान परिषदेत आज कर्नाटक सरकार विरोधात ठराव समंत करण्यात आला. त्यानंतर लक्षवेधीवरील चर्चेनंतर पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर बोलतांना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी करत भाषण केले. आज त्यांचे मुख्य लक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadanvis) होते. मिश्किल टिप्पणी आणि टोलेबाजी करत भाषण करत असतांना आज पुन्हा त्यांनी सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save) यांना सुनावले.

अजित पवार म्हणाले, सहा महिने झाले तरी अजून अतुल सावे सहकार खात्यात रुळलेले नाही. कोणतेही काम, फाईल त्यांच्याकडे गेली की ते देवेंद्रजींना फोन करून विचारतो असे उत्तर देतात. हे योग्य नाही, देवेंद्रजींकडे आधीच सहा विभागाचा कारभार आहे, त्यांना अजून किती ताण देणार. विनायकराव पाटील हे तुमच्याच जिल्ह्यातील नेते सहकारमंत्री होते. त्यांनी हे खाते खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते. त्याच प्रमाणे तुम्ही काम करणे अपेक्षित आहे, असेही अजित पवार म्हणाले.

याआधी देखील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी अतुल सावे यांना महापुरूषांचे पुस्तक आणि गुलाबाचे फुल देत चिमटा काढला होता. सहकार मंत्री अतुल सावे हे सभागृहात जाण्यासाठी येत असतांना अजित पवारांनी त्यांना गाठले होते.

सावेसाहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून फारच बदललात बाबा, मी देवेंद्रजींना देखील म्हणालो, सावेंना जरा सांगा. सावेसाहेब असं तुटक तुटक राहायचं नसतं. सत्ता येत असते, सत्ता जात असते, अशा शब्दांत पवारांनी सावेंना चिमटा काढला होता. यावर अतुल सावे यांनी नाही हो साहेब तसे काही नाही, असे म्हणत वेळ मारून नेली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com