Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Political News : होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधीसाठी महादुला येथे उभारणार महाविद्यालय

Pradeep Pendhare

Mumbai News : महादुला येथील सेवानंद विद्यालयाच्या विकासासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने पुढाकार घेतला आहे. या विकासकामासाठी महाविद्यालयाचा आराखडाही तयार झाला आहे. यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आलेल्या 5.4 हेक्टर जमिनीसंदर्भात सरकारने निर्णय घेतला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) अध्यक्ष असलेल्या विदर्भातल्या कोराडी येथील 'महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या संस्थेला राज्य सरकारकडून 5 हेक्टरचा भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता होती. मात्र, या प्रकरणात महत्त्वाची अपडेट आली आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ही राज्यातील नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेला राज्य पर्यटन विभागाकडून 'ब' दर्जा देण्यात आला आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एकमताने नियुक्ती झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी येथे कनिष्ठ महाविद्यालय, विज्ञान-कला व वाणिज्य महाविद्यालय व कौशल्य विकास केंद्राअंतर्गत तंत्रशिक्षण व नर्सिंग महाविद्यालय सुरु केले जाणार आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबा संस्थान या सार्वजनिक देवस्थान- सावर्जनिक न्यायाचे अध्यक्ष आहेत. दत्तुजी समरितकर हे सचिव आहेत. या संस्थेमार्फत महादुला कोराडी इथं सेवानंद विद्यालय चालवलं जाते. संस्थएला आता कनिष्ठ महाविद्याल, विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्याल तसंच कौशल्य विकास केंद्रांतर्गत तंत्रशिक्षण आणि नर्सिग महाविद्यालय सुरू करण्याचं नियोजन आहे.

यासाठी महालक्ष्मी जगदंबा संस्थेने इमारत, प्रयोगशाळा, खेळाचं मैदानासह इतर सुविधांसाठी 5.04 हेक्टर आर एवढ्या सरकारी भूखंडाची मागणी सरकारकडे केली होती. या भूखंडाचा दर सरकारी मुल्यानुसार म्हणजेच, रेडी रेकनरप्रमाणे एकूण किंमत 4 कोटी 86 लाख असून सरकारच्या धोरणानुसार शैक्षणिक प्रयोजनासाठी सवलतीमध्ये थेट द्यावी, अशी मागणी संस्थेने केली होती.

सरकारच्या धोरणानुसार संशोधन कार्य, समाजातील वंचित आणि दुर्लभ घटकांसाठी, दिव्यांगासाठी, उच्च व तंत्रशिक्षणासाठी असणाऱ्या शैक्षणिक संस्थांना तसा भूखंड देता येतो. 'महालक्ष्मी जगदंबा संस्थान' ही संस्था संशोधन कार्य करत नाही.

तसंच ही संस्था प्रसंगानुरूप काम करते. त्यासाठी संस्थेस कायमस्वरूपी भूखंडाची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे या संस्थेला 2023-24 च्या शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शिक्षण मंडळाने परवानगी दिली असून सरकारच्या मान्यतेची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT