Crime news Sarkarnama
विदर्भ

Political Crime : धक्कादायक! नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, काँग्रेस नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Gadchiroli Political Case : अहेरी नगरपंचायतीचे कर संवर्धन अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर आज सकाळी अज्ञात गुंडांनी जीवघेणा हल्ला केला.

Aslam Shanedivan

Gadchiroli News : अहेरी नगरपंचायतीचे कर संवर्धन अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली असून यामुळे गडचिरोली हादरले आहे. पांढरे यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर या प्रकरणात काँग्रेसच्या एका बड्या नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहेरी नगरपंचायतीचे कर संवर्धन अधिकारी वैभव पांढरे नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी ते अबनपल्ली फाटा परिसरात पोहोचले असताना त्यांच्यावर अज्ञातांनी त्यांना रस्त्यातच अडवलं आणि लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.

दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. तसेच त्यांच्या हात आणि पायांनाही गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चरही झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या हल्ल्यादरम्यान आरडा-ओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ज्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. तर उपस्थितांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या पांढरे यांना तातडीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान आता या घटनेत राजकीय हात असल्याचे समोर आले असून काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी कंकडालवार यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तर पोलिस अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT