

Land Dispute News : मालमत्तेच्या वादातून घडलेल्या एका भीषण घटनेत सांगली जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सहा जणांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भीमा नदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात यापूर्वीही अनेक हिंसक संघर्ष घडले आहेत.
पोलिस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निराळे आणि गोलागी कुटुंबांमधील दीर्घकालीन जमीन वादातून ही घटना घडली. आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला व नंतर गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. मृतांची नावे रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर नदाफ अशी आहेत. या हल्ल्यात आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला असून, मृतांची संख्या सहा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढत होता. हा वाद मिटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक पातळीवर मध्यस्थींची बैठकही घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी जमीन वादासंदर्भातील आणखी एका तोडगा बैठकीसाठी निराळे कुटुंबातील सदस्य आणि इतर काहीजण गेले असता त्यांच्यावर हल्लेखोरांच्या टोळीने हल्ला केला.
घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, पुढील अनर्थ टाळण्यासाठी गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या भीमा नदीच्या तीरावरील गावात जमिनीचा वाद, अनैतिक संबंध यातून गुंडगिरी उफाळून अनेकवेळा खुनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षात खुनाच्या घटना कमी झाल्याचे बोलले जात असतानाच या सामूहिक हत्याकांडामुळे भीमेचा तीर पुन्हा रक्तरंजीत झाला आहे. दरम्यान या प्रकरणाचातपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.