Bachchu Kadu criticism Sarkarnama
विदर्भ

farmer loan waiver controversy : नाव राधाकृष्ण, कृत्य कंसाची! औलादीचं वाहन फोडणाऱ्याला बक्षीस; मंत्री विखेंवर बच्चू कडूंचा 'प्रहार'

Bachchu Kadu Strongly Criticizes BJP Minister Radhakrishna Vikhe Patil Over Wrong Statement on Farmer Loan Waiver Ahilyanagar News : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून केलेल्या विधानावर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली.

सरकारनामा ब्युरो

Bachchu Kadu criticism on Vikhe Patil : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वादग्रस्त विधानावर प्रहारचे बच्चू कडू यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

'नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचं करायची असेल तर, कंसाची ही औलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे, असा संताप व्यक्त करताच, या अवलादीच वाहन फोडणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस माझ्याकडून मिळेल,' अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी (Farmer) कर्जमाफीवर केलेल्या वादग्रस्त विधानावर बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या विधाचा समाचार घेताना, सरकारने मंत्री विखे पाटील यांच्या कारखान्याला किती कर्जमाफ केलं, असा प्रश्न केला. यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री विखे पाटलांवर त्यांच्या विधानावरून जोरदार हल्ला चढवला.

बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटलांची (Radhakrishna Vikhe) गाडी फोडेल, त्याला एक लाख रुपयांचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल, अशी थेट घोषणा केली. ते म्हणाले, "नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचं करायची असेल तर, कंसाची ही औलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे. फडवणीससाहेब कर्जमाफीची घोषणा करत आहेत. तर हे वाचाळवीर मंत्री आहे, अशी विधानं करत आहेत. शुकरमाना लोक तुम्हाला अजून मारत नाहीत. त्यामुळे ही नालायकी थांबवा."

मंत्री विखेंचं विधान काय होतं

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, “उद्याचे भविष्य आमच्या तरुणांसाठी आहे. आमचे गेले आता. सोसायटी आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढून थकलो आम्ही. सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचे आणि पुन्हा मग कर्जमाफीची मागणी करायची.”

निवडणूक उत्पादनाचं काम नाही

दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या वादग्रस्त विधानावर सावरासावरी केली आहे. ते म्हणाले, 'मला आश्चर्य वाटतंय की, मी इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनात शेतकरी विरोधी विधान केल्याचं आठवत नाही. अनेकजण सोसायटीचे कर्ज काढून निवडणुका लढवतात आणि कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करतात. कर्ज काढून निवडणूक लढविणे हे उत्पादन स्वरूपाचं काम नाही, हा त्याचा अर्थ होता.'

खूप वेदना होतात

'वरील विधानाचा अर्थ असा नाही की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे. मी शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात नाही. वक्तव्याचा विपर्यास झाल्याने मला खूप वेदना होत आहेत. 30 वर्षाच्या सामाजिक जीवनात माझी शेतकऱ्यांच्या विरोधी एकही भूमिका घेतलेली नाही,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT