Income tax notice Buldhana police : खोटी गुंतवणूक दाखवणं 1050 पोलिसांना भोवलं; आयकर विभागाच्या नोटिसांनंतर खळबळ

Income Tax Notice to 1050 Buldhana Police Officers : बुलढाणा जिल्हा पोलिस दलातील तब्बल 1050 पोलिस कर्मचाऱ्यांनी रिटर्न्समध्ये कर चोरी करण्याच्या संशयावरून आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.
Income tax notice Buldhana police
Income tax notice Buldhana policeSarkarnama
Published on
Updated on

Buldhana police IT return fraud : अभिनेता अजय देवगण याच्या 'रेड' अन् 'रेड-2' चित्रपटातलं, आयकर विभागाचं ब्रीद 'कोष मूलो दंड', चांगलच चर्चेत आलं. याचपद्धतीने आयकर विभागाने एकाच वेळी, बुलढाणा जिल्हा पोलिस दलातील तब्बल 1050 पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर वाचवण्यासाठी खोट्या गुंतवणूक केल्याच्या संशयावरून नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे.

एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर विभागाच्या नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने महाराष्ट्रात बुलढाणा पोलिस दल चर्चेत आलं आहे. आयकर विभागाच्या या अ‍ॅक्शननंतर बुलढाणा पोलिस दलाचे प्रमुख नीलेश तांबे देखील पोलिस कर्मचाऱ्यांच्या या प्रतापावर नाराज झाले असून, कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा देणारा संदेश बिनतारी संदेश विभागातून पाठवला आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पोलिस दलात आयकर विभागाच्या नोटिसांमुळे खळबळ उडाली आहे. तब्बल 1050 पोलिस अंमलदारांना तीन ते चार वर्षांत आयकर रिटर्न्समध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाने पोलिस अधीक्षक कार्यालयाला देखील नोटीस बजावली आहे. यामुळे बुलढाणा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

हा प्रकार चार्टर्ड अकाउंटेंटच्या संगनमताने करण्यात आल्याचं समोर येत आहे. पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी ही कर चुकवेगिरी चार्टर्ड अकाउंटेंटशी संगनमत करत केल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत देखील समोर आलं आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कलम 80c आणि गृह कर्जावरील व्याज सवलतीच्या अंतर्गत बनावट गुंतवणुकी दाखवत कर कपात मिळवल्याचं समोर आलं आहे.

Income tax notice Buldhana police
BJP Vivek Kolhe Vs NCP : भूलथापा देत आमदारकी काढली, आता नाही..; पालिका निवडणुकांसाठी भाजपच्या विवेक कोल्हेंनी भरला दम

प्रत्यक्षात विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा गृह कर्ज नसतानाही मोठ्या रकमेच्या कपाती दाखवल्या गेल्या आहेत. हे सर्व रिटर्न एकाच चार्टर्ड अकाउंटेंटच्या माध्यमातून दाखल करण्यात आल्याचा समोर आलं आहे. आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिटर्नची पडताळणी केल्यावर हा सर्व बोगस प्रकार उघडकीस आला. आयकर विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर पोलिस अधीक्षक कार्यालयाला देखील नोटीस बजावली आहे.

Income tax notice Buldhana police
NCP warning to BJP : 'वाटेला गेला तर, विधानसभा सभागृहात देखील...'; भाजपच्या पडळकरांना अजितदादांच्या शिलेदारानं थेट सुनावलं

एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर विभागची नोटीस आल्याने बुलढाणा पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी कठोर भूमिका घेत, पोलिस अंमलदारांना आपले इन्कम टॅक्स रिटर्न्स तपासून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यात चूक आढळल्यास तात्काळ सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

...तर विभागीय चौकशी होणार!

आयकर विवरणपत्र सादर केल्यास ते सुचनेचे पालन मानले जाईल अन्यथा आयकर कायदा 1961च्या तरतुदीनुसार सबंधितांवर आवश्यक कारवाई केली जाईल. तसंच आयकर विभागाच्या नोटिसांनंतर सुधारणा न केल्यास फसव्या कृतीत सहभागी म्हणून, विभागीय चौकशी नियमानुसार कारवाई केली जाईल. फसव्या आणि बोगस सूट कपातीच्या दाव्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून होणाऱ्या दंडात्मक आणि खटल्याच्या परिणामाची जाणीव असू द्यावी. आयकर विभागाकडून पुढे कठोर कार्यवाही होऊ शकते, याकडे पोलिस अधीक्षकांनी लक्ष वेधले.

दंडात्मक अथवा खटला चालणार

नोटीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी उद्या (ता. 10) पर्यंत सुधारीत आयकर विवरणपत्र दाखल करून या कार्यालयास त्याची पोच दाखल करण्याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिल्या आहेत. तसे न केल्यास आयकर विभागाकडून सबंधितांवर दंडात्मक अथवा खटल्याची कारवाई झाल्यास त्यास संबंधित पोलिस अधिकारी किंवा अंमलदार हे स्वतः जबाबदार राहतील, असे देखील म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com