Ajit Pawar And RSS .jpg Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar: 'आरएसएस'कडून महायुतीच्या आमदारांना भेटीचं निमंत्रण; अजितदादांची पुन्हा दांडी की भूमिका बदलणार?

Nagpur Winter Session 2024 : याआधीही नागपुरात जाऊनही अजितदादांनी दोनदा भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयात जाणं टाळलं होतं. पण आता ते महायुतीत चांगलेच रुळले आहेत. तसेच त्यांचे 41 आमदार निवडून येण्यात भाजपसह संघाचंही योगदान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अखेर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी (ता.15) नागपुरात पार पडला. यात महायुतीच्या (Mahayuti) 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्‍यांचा समावेश आहे. पण मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत नाराजीनाट्य रंगलं आहे. अनेक इच्छुक आणि शर्यतीत असलेल्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी डावलण्यात आल्यानं तीव्र नाराजी आहे. यातच नागपुरातून मोठी माहिती समोर आली आहे.

नागपुरातील राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाकडून महायुतीच्या सर्व आमदारांना येत्या 19 डिसेंबरला सकाळी 8 वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणानुसार महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचे आमदार यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार उपस्थित संघ कार्यालयात जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याआधीही नागपुरात जाऊनही अजितदादांनी दोनदा भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयात जाणं टाळलं होतं. पण आता ते महायुतीत चांगलेच रुळले आहेत. तसेच त्यांचे 41 आमदार निवडून येण्यात भाजपसह संघाचंही योगदान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे अजितदादा आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की संघाचं निमंत्रण स्विकारणार याकडे लक्ष लागलेलं आहे.

आमची शाहू,फुले आणि आंबेडकर ही विचारधारा आम्ही सोडणार नाही म्हणत महायुतीत दाखल होऊनही अजित पवार आणि त्यांचे आमदार सरकारमध्ये सुरुवातीला थोडे फटकूनच वागत होते. त्यात फडणवीसांनीदेखील अजितदादांशी आमची असलेली युती नैसर्गिक नसून राजकीय असल्याचं म्हणत महायुतीतलं राष्ट्रवादी काँग्रेसचं 'अवघडलेपण' अधोरेखित केलं होतं.

मात्र,आता मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झालेल्या महायुतीच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (RSS) भेटीचं निमंत्रण धाडलं आहे. पण आता यात अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस संघाच्या कार्यालयात जाणार की संघाचं निमंत्रण धुडकावणार याकडं सर्वांचेचं लक्ष लागलेलं आहे.

काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,यांच्यासह महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंसह महायुतीतील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर शिंदे व फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले होते. मात्र,संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणे टाळले होते. त्यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT