
Sudhir Mungantiwar Politics News : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आणि रविवारी नवीन मंत्रिमंडळाचा नागपुरात शपथविधीही पार पडला. मात्र या मंत्रिमंडळात भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर आज मुनगंटीवार विधिमंडळाच्या कामकाजातही दिसले नाही आणि मुनगंटीवारांनी केंद्रीयमंत्री गडकरींचीही भेट घेतली. त्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. यावर अखेर सुधीर मुनगंटीवार यांनीच माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.
सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) म्हणाले, ''मी व्यथित असण्याचं कारणचं नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही. जेही पद मला पक्ष देतो, त्या पदासाठी मी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे की, मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं, एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं. ते मला फक्त माहीत नाही. पण बाकी मला याबाबतची कोणतीही माहिती नाही, मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो आग्रहपूर्वक मांडायचो आता विधानसभेत मांडेन.''
तसेच ''मला संधी का दिली नाही, याचं उत्तर मी कसं देऊ. पण संधी दिली नाही म्हणून मी नाराज नाही. मी आमदार आहे मंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत मी माझं मत मांडायचो. आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी माझं मत संसदीय आयुधांचा उपयोग करून मी निश्चित मांडेन.'' असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.
याचबरोबर काही वरिष्ठ पातळीवर तुमचं बोलणं झालेलं आहे का? फडणवीस म्हणाले तुमच्यासाठी काही वेगळी जबाबदारी ठेण्यात आलेली आहे? मीडियाच्या या प्रश्नांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ''हा मग तेच खरं. कारण ते सर्व त्यांनाच माहीत असणार आहे. त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहात? माझं वरिष्ठ पातळीवर काही बोलणं झालेलं नाही. पण तुमचं झालेलं आहे ना वरिष्ठ पातळीवर बोलणं मग आता काय विषय राहिलेला आहे.''
या प्रश्नाला उत्तर देताना ''अहो अशी चर्चा कधी टीव्ही चॅनलवरून सांगायची असते का? शेवटी ही एका मोठ्या भावासोबत छोट्या भावाची असणारी भेट आहे. या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का? पण ते नेहमीच, जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात. तेव्हा तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं. देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन. देवेंद्रजींनी जेव्हा मी आणि चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला, त्या भाषणात त्यांनी सांगितलंच होतं ना श्रद्धा आणि सबुरी तेच मार्गदर्शन अजून काय मार्गदर्शन असणार आहे?'' असं मुगंटीवार यांनी सांगितलं.
यावर बोलताना ''माझी पुढीच भूमिका विधानसभेत गरिबांचे प्रश्न मांडायचे. आता माझी जुनी पुस्तकं काढलेली आहेत. सर्व संसदीय आयुधं मी वापरायचो, आता पुन्हा एकदा संसदीय आयुधं वापरण्याची सवय विकसित करायची.'' असंही यावेळी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं
या प्रश्नाचे उत्तर देताना ''नाही, असं कुणीही म्हणून नका आणि मी कधीच नाराज राहत नाही. एका गोष्टीची मला चांगली जाणीव आहे, की काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे आणि उद्या जे आपल्यापाशी नाही ते परवा येणार आहे.'' तसेच देवेंद्र फडणवीसांशी(Devendra Fadnavis) केव्हा भेट होईल? जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेट होईल. ''अद्याप त्यांच्याशी बोलणं केलेलं नाही, दोन दिवसांनी करेल. दिल्ली श्रेष्ठींशी आता सध्या बोलण्याचं काही कारण नाही. आता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्य्याचा अभ्यास करतो आहे. विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नांसाठी काय काय मांडायचं त्याची पूर्व तयारी करतो आहे. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांडले आता विधानसभेत मांडेन.'' असं म्हणत मुनगंटीवारांनी भूमिका स्पष्ट केली.
''मला आज काहीही माहिती नाही. मी मंत्री नाही, आमदार आहे. ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल. तसेच, भाजपमधून तुमची वर्णी केंद्रात लागण्याची शक्यता आहे का? यावर दूरदूर पर्यंत नाही.'' या मोजक्या शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.