Ajit Pawar and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Big Step : विदर्भातील राष्ट्रवादीला ग्रहण लावणारे ठरले अजित पवारांचे बंड !

Vidarbha : पक्षाची विदर्भात फारशी संघटनात्मक शक्ती नाही.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News in Marathi : अजितदादा पवारांच्या नेतृत्वातील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावला. या बंडात विदर्भातील चार आमदार व पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजितदादांसोबत गेले आहे. पक्षाची विदर्भात फारशी संघटनात्मक शक्ती नसली तरी या बंडाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात ग्रहण लागले आहे. (Both Atram and Naik families are considered loyal to Sharad Pawar)

अनेक जण संभ्रमात असून सध्याही मौन बाळगून आहेत. पण एकंदरीत हे बंड विदर्भातील राष्ट्रवादीला ग्रहण लावणारे ठरणार आहे. गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अजितदादांची कास धरत आज दादांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. दादांनी त्यांच्या समर्थक आमदारांची जी यादी राजभवनात दिली, त्यात पुसदच्या इंद्रनील नाईकांचेही नाव आहे.

आत्राम व नाईक ही दोन्ही घराणे शरद पवारांची निष्ठावान मानली जातात. त्यांनीच शरद पवार यांची साथ सोडणे काहीसे आश्चर्यकारक व वाऱ्यांची नवी दिशा दाखवणारे मानले जात आहे. विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी हेसुद्धा दादांसोबत आहे. तर भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे हे पटेलांचे निष्ठावान आहेत. पटेल दादांसोबत गेल्याने कारेमोरेंचीही दिशा स्पष्ट झाली आहे.

पवार घराण्याशी निष्ठा बाळगणारे आणखी एक घराणे बुलढाणा जिल्ह्यातील शिंगणेंचे आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे सध्या खाजगी कामासाठी हिमाचल प्रदेशात गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

नागपूर जिल्ह्यात अनिल देशमुख व रमेश बंग हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि दोघेही शरद पवार यांचे निष्ठावान म्हणूनच ओळखले जातात आज ते पवारांसोबतच आहेत. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके हे अजितदादांसोबतच आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमदार मनोहर चंद्रिकापुरे हेसुद्धा अजित पवारांसोबत गेले आहेत.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांचे मोबाईल नॅाट रिचेबल आहेत. अकोला (Akola) जिल्ह्यातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख हे दोन नेते अजितदादांच्या शपथविधीला उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT