Ajit Pawar Big Step : काॅंग्रेस नेते म्हणतात, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे हे अखेरचे अधिवेशन !

Vijay Wadettiwar : कालची फूट ही अनपेक्षित होती, असं म्हणणं चुकीच आहे.
Vijay Wadettiwar and Eknath Shinde
Vijay Wadettiwar and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News in Marathi : महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी दंगली घडवल्या, जातीय तेढ निर्माण करून बघितलं. पण येवढं करूनही त्यांना यश आलं नाही. आपला पाय खोलात जातोय, हे त्यांच्या लक्षात आलं. अन् त्यांनी हा नवीन प्रयोग केला. पण आता त्यांचा पाय अधिक खोलात गेला, असं कॉंग्रेस नेते, राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

आज (ता. ३ जुलै) आमदार वडेट्टीवार नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कालची फूट ही अनपेक्षित होती, असं म्हणणं चुकीच आहे. ते अपेक्षीतच होतं. शरद पवारांचे प्रयत्न सुरू होते, अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना थांबायचं नव्हतं. अजित पवारांना जाण्याचं काही एक कारण नव्हतं. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. (The rulers created riots in Maharashtra)

प्रदेशाध्यक्षपदाच्या छोट्या-मोठ्या कारणावरून ते गेले नाहीत. अजित पवारांच्या जाण्याचे कारण काल शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. काल झालेली फूट ही महाराष्ट्रातील एकूण राजकीय वातावरण ढवळून काढणारी आहे. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राहू शकत नाही. सत्ता गेली त्या दिवसापासून धुसफुस वाढली होती. दादांचा कल सत्तेकडे होता, हे पवार साहेबांसह त्यांच्या इतर नेत्यांच्या लक्षात आले होते. शरद पवारांनी समजवण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण त्यांच्याही आवाक्याबाहेर गेल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar and Eknath Shinde
आता 'ती' गल्लत करत नाही | Supriya Sule On Ajit Pawar | Sarkarnama | #shorts

कालच्या पवारांच्या वक्तव्यावरून असं वाटतं की, ते महाविकास आघाडीबरोबर राहतील. आम्ही कॉंग्रेस, उद्धव ठाकरे राष्ट्रवादी एक सशक्त पर्याय देणार आहोत. आम्ही जनतेपुढे जाणार आहो. आता जनतेच्याच कोर्टात काय ते ठरेल. सत्ताधाऱ्यांचा पाय खोलात जातो आहे, ते या स्थितीतून स्पष्ट होत आहे. ९० टक्के लोकांनी या घाणेरड्या राजकारणावर चीड व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावरून सामान्य जनतेने चीड व्यक्त केली. कारण मूलभूत प्रश्‍न बाजूला सारले गेले. महागाई, बेरोजगारी, शेतकरी या विषयांवर तर कुणीच बोलत नाहीये. जातीय तेढ निर्माण करूनही त्यांना यश आले नाही. म्हणून हा प्रयोग भाजपने केला आहे. एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री म्हणून आगामी अधिवेशन हे त्यांचे अखेरचे अधिवेशन असेल. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर काय, याची तजवीज भाजपने करून ठेवली आहे.

Vijay Wadettiwar and Eknath Shinde
NCP Crisis News : साहेब की दादा ! राष्ट्रवादीत कुणाचं वाजन जास्त ? कोण कुणाकडे असणार याची संभाव्य यादी समोर

पुन्हा विस्तार केला तर काय होईल, हे शिंदे (Eknath Shinde) गटातील नेत्यांचे कालचे चेहरे बघून लक्षात येत होते. फसगत झाली की काय, असं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होतं. आता या परिस्थितीत कॉंग्रेस (Congress) अधिक शक्तीने उभी राहणार, हे मात्र निश्‍चित, असे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com