Manoharrao Naik Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Calls Meeting : शरद पवारांचे एकनिष्ठ मनोहर नाईक यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद...

Manoharrao Naik : मनोहरराव नाईक यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

दिनकर गुल्हाने

deputy cm of maharashtra Ajit Pawar News : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससह राज्याच्या राजकारणात भूकं झाला. नेते आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाली. अनेक जण निर्णय घेताना संभ्रमात सापडले होते. अशा परिस्थितीत शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले पुसदच्या नाईक घराण्याने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. (The Naik family of Pusad decided to go with Ajit Pawar)

वयाची तमा न बाळगता राजकारणात सक्रिय असलेल्या माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, १९५२ पासून नाईक घराण्याला जनता साथ देत आहे.विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. हा निर्णय घेताना नाईक घराण्याला साथ द्यावी, अशी भावनिक साद मनोहरराव नाईक यांनी कार्यकर्त्यांना घातली.

गेल्या चार वर्षांत पुसद मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळालेला नाही, हे वास्तव आहे. सत्तेत असल्याशिवाय निधी मिळणार नाही. त्यामुळे विकास कामे डोळ्यांसमोर ठेवून अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय योग्य आहे, असे नाईक म्हणाले. कार्यकर्त्यांच्या सभेचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे यांनी केले. त्यांनी पुसद विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी अजित पवारांच्या पाठीशी राहण्याची भावना व्यक्त केली.

यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद जिल्हा करण्यात यावा. त्यासाठी शेंबाळपिंपरी, काळी दौलतखान, ढाणकी या तीन नवीन तालुक्यांची निर्मिती करावी. माळपठारावर लिफ्ट इरिगेशन योजना आणावी. अजित दादांनी ५० कोटी रुपयांच्या निधीचे आश्वासन दिले, ते पुरेसे नाही. मतदारसंघाचा आवाका व विकास आराखडा पाहता पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळवावा, इसापूर प्रकल्पबाधितांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी अपेक्षा मोहटे यांनी परखड शब्दांत व्यक्त केली.

आदिवासी समाजाच्या वतीने सुनील ढाले, निशांत बयास, जैनुद्दीन सिद्दिकी, बी.जी. राठोड, जयश्री देशमुख, गुणवंत सूर्यवंशी, विलास डंगाले, महेश चव्हाण, शंकर तालनकर, करण ढेकळे, गजानन फोपसे, शेख वहाब भाई, कलीम, आशिष बोके, भोलानाथ कांबळे, ॲड. रमेश पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. युवा नेतृत्व वैभव फुके यांनी मतदारसंघातील सर्व कामे नाईक घराण्याने केले असल्याने नाईक हाच आमचा पक्ष, आपण घ्याल तो निर्णय मान्य, या शब्दांत समर्थन केले.

व्यासपीठावर विजयराव चव्हाण, अनुकूल चव्हाण, दीपक आसेगावकर, दिलीप पारध, श्रीराम पवार, दौलत नाईक, आशा पांडे, अनिता चव्हाण, प्रवीण नाईक, सुभाष कांबळे नामदेव मार्कड, रमेश मस्के, अमोल फुके यांची उपस्थिती होती. या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद (ZP) पंचायत समितीचे माजी सदस्य, पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT