Ajit Pawar Live News : नागपुरात ठरलं; शहर शरद पवारांसोबत, तर ग्रामीण अजित दादांकडे !

Nagpur : बाबा गुजर यांची यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली होती.
Duneshwar Pethe, Shekhar Sawarbandhe and Baba Gujar, NCP.
Duneshwar Pethe, Shekhar Sawarbandhe and Baba Gujar, NCP.Sarkarnama

DYCM Ajit Pawar News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यभरात अभूतपूर्व गोंधळ उडाला. सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात सापडले. अनेकांना निर्णय घेता येत नव्हता, तर काही जण अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. उपराजधानी नागपुरातही असाच काहीसा गोंधळ उडाला होता. (City president Duneshwar Pethe was also not taking calls)

अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शहर राष्ट्रवादीमध्ये गोंधळ उडाला होता. त्यांचा निर्णय होत नव्हता. शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे हेसुद्धा कॉल घेत नव्हते. अखेर आज (ता. ४) सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या बैठकीनंतर शहर राष्ट्रवादी शरद पवारांसोबत तर ग्रामीण राष्ट्रवादी अजित पवारांसोबत, असे चित्र दिसत आहे. पण बाबा गुजर यांच्यासोबत किती कार्यकर्ते उद्याच्या (ता. ५) मुंबई येथील बैठकीला जातील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण ग्रामीण राजकारणावर पकड असलेले नेते अनिल देशमुख आणि रमेश बंग हे शरद पवारांसोबत आहे. अशा स्थितीत बाबा गुजर यांच्यासोबत फार कुणी जाईल, असे वाटत नाही.

दरम्यान शहर कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि शरद पवारांसोबत गद्दारी करणारे खासदार प्रफुल्ल पटेल आणि बाबा गुजर यांचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी फाडले. या दोन्ही नेत्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे नागपूर शहर आणि जिल्ह्याचे राजकारण प्रभावित झाले आहे.

Duneshwar Pethe, Shekhar Sawarbandhe and Baba Gujar, NCP.
Ajit Pawar Live News : चालत्या गाडीत चढा, सामान्य कार्यकर्त्यांची भावना...

शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी आज शहर कार्यकारिणीची बैठक घेतली. यामध्ये प्रवीण कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांच्यासह प्रदेशचे पाच पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय सर्व आघाड्या आणि सेलचे अध्यक्षही उपस्थित होते. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रती आपली निष्ठा व्यक्त केली आणि त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भविष्यात आमदार अनिल देशमुख, (Anil Deshmukh) रमेश बंग यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम करणार असल्याचे राष्‍ट्रवादीचे नेते शेखर सावरबांधे यांनी माध्यमांना सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com