Nagpur News : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
तुमच्या डिपार्टमेंटचे अधिकारी 10 टक्के कमिशन घेतात आणि छोट्या कंत्राटदारांना दोन दोन वर्षे पेमेंट दिले जात नाही, असाही आरोप यावेळी करण्यात आला.
शहराध्यक्ष प्रशांत पवार, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, रमण ठवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नंदनवार यांना घेराव घालण्यात आला. प्रशांत पवार यांनी तुमच्या डिपार्टमेंटचे लोक 10 टक्के कमिशन घेतात आणि गरीब कॉन्ट्रॅक्टरांना ताटकळत ठेवले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
छोटे कंत्राटदार (Contractors) आपल्या घरचे सोने-नाणे गहाण ठेवून कामे करतात. मात्र त्यांना पेंमेंट देताना झुलवल्या जाते. कोट्यवधींची कामे घेणाऱ्या ठेकेदारांचे देयके पटापट काढले जातात. यासाठी पैसा कुठून येतो, असा सवालही प्रशांत पवार यांनी यावेळी केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व त्यांच्या मुलाबाळांकडे दोन-दोन लाखांचे मोबाईल आहेत, एवढे महागडे फोन कुठून येतात याची उच्चस्तरीय तपासणी करावी आणि कमिशन घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचीही मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
थेट आरोप आणि कार्यकर्त्यांचे आक्रमक रूप पाहून मुख्य अभियंता नंदनवार यांनी आठ दिवसांच्या आत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतो. कोणाचे देयके थांबले आहेत, त्याची पडताळणी करतो, असे आश्वासन दिले. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तानाजी वनवे, अमरीश ढोरे, समीर राहाटे, एकनाथ फलके, मनिषा शाहू, सुधीर पाटील, अनंता फुलझडे आदी सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.