Ajit Pawar News Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटणार

Lok Sabha Election 2024 : गोंदिया येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत. सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याला केले संबोधित

अभिजीत घोरमारे

Ajit Pawar : महायुतीतील मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा येत्या दोन दिवसांत सुटणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात त्यांनी जाहीर सभेत हे संकेत दिले आहेत. त्यामुळे लवकरच कोणाच्या पदरात किती जागा पडणार हे कळणार असल्याचे पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक महायुतीत लढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा संकल्प असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. 65 टक्के जनतेचे मत मोदी यांना पंतप्रधान बनविण्याचे आहे, असेही पवार म्हणाले आहे. या घडामोडीत प्रफुल पटेल यांनी पुन्हा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर आपला अधिकार सांगत अजित पवारांना अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.

सडक अर्जुनीत गुरुवाारी (ता. सात) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. महायुतीसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गोंदिया जिल्ह्यात हा पहिलाच दौरा होता. पहिलीच सभा होती. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार गटासाठी घेण्यात आलेली ही जाहीर सभा महत्त्वाची होती. या वेळी पवारांनी आपल्या भाषणात विकासासाठी आमदारांच्या म्हणण्यानुसार आपण सत्तेत सहभागी झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळेच गोंदियात येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्याचे पैसे मिळवून दिल्याचे अजित पवार म्हणाले आहे. अधिकाऱ्याद्वारे करण्यात येणारी हेकेखोरी कशी असते याचे उदाहरण त्यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने पैसे दिले तर अधिकारी पैसे खातात. अधिकाऱ्यांना दम देत ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे पैसे सहज खात्यात टाका. शेतकऱ्यांचे पैसे अधिकार्‍यांनी खाल्ले तर चालणार नाही, असा दम त्यांनी भरला. विकासाच्या त्यातही शेतकऱ्यांच्या योजनेत अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने बाजूला सारल्याचेही त्यांनी सांगितले. आपणही सामान्य शेतकरी आहोत. आपलाही दुधाचा व्यवसाय असल्याचे अजित पवार म्हणाले. विदर्भात धान पिकते. आपल्या भागात उसाची शेती असल्याचे पवार यांनी सांगितले.

आपल्याला विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, हे माहिती असल्याचे पवार म्हणाले. आपण वचनपूर्ती करण्यासाठी राजकारण करतो. गोसेखुर्दला विलंब झाला असला तरी मोठा निधी प्रकल्पाला देण्यात आला आहे, असे पवारांनी नमूद केले. विदर्भाच्या धरणांसाठी आताच दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. लवकरच साडेआठ लाख विद्युत प्रकल्प सौरऊर्जेवर आणून दिवसा वीज देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महायुतीचा धर्म पाळत पवारांनी भाजप नेते नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर्वंकष प्रयत्न करण्याची सूचना केली.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT