Gondia Praful Patel : नुकतीच मिळाली राज्यसभा, पण पटेलांना आवरेना लोकसभेचा मोह, मग दादांनी सुनावलेच !

Ajit Pawar : अजित पवार यांनी भाषणात त्यांना नुकतीच राज्यसभेची जागा दिल्याचा उल्लेख करत पुन्हा पटेलांचा लोकसभेचा 'लाड' पुरविणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.
Praful Patel and Ajit Pawar
Praful Patel and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Gondia Praful Patel : कालावधी संपण्यापूर्वीच पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा मोह अद्याप गेल्या नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. आज (ता. 7) गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी 'सर्व्हे'चा आधार घेत पुन्हा भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीररीत्या व्यक्त केली आहे.

पटेलांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी फारसे लक्ष न देता आपल्या भाषणात त्यांना नुकतीच राज्यसभेची जागा दिल्याचा उल्लेख करत पुन्हा पटेलांचा लोकसभेचा 'लाड' पुरविणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे. असे असले तरी प्रफुल पटेल यांची सुप्त इच्छा पुन्हा एकदा बाहेर आल्याने भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

प्रफुल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रफुल पटेल यांचा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर दावा संपल्याचे राजकीय जाणकार सांगत होते. मात्र, आज अचानक जाहीर सभेमध्ये प्रफुल पटेल यांनी झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी सर्व्हेत आपले नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे अजित पवारांना जाहीर भाषणात सांगितले आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद बघता ही लोकसभेची जागा लढवण्याची इच्छाही पटेलांनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praful Patel and Ajit Pawar
Praful Patel News : जयंत पाटलांच्या मुक्कामावर बोलताना सुळेंचे स्वागत; प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले?

सर्व्हेमध्ये एकाच माणसाचं नाव येतं आहे, त्यांचे नाव प्रफुल पटेल आहे. जे लढणार आहेत, त्यांनी समजून घेतले पाहिजे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याशिवाय कुणालाही येथे निवडून येता येत नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याने विचलित होण्याची गरज नाही, असेही ते जाहीर सभेत म्हणाले आहे. त्यामुळे आपल्याला वगळून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात लढण्याचा विचार करू नये, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे.

भंडारा-गोंदियाची जनता संभ्रमात..

महायुतीत ही जागा भाजपकडे आल्याची चर्चा रंगत असताना प्रफुल पटेल यांच्या दाव्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. लवकरच दोन-तीन दिवसांत लोकसभेच्या जागावाटपाबाबत बैठक होणार असून, चित्र स्पष्ट होणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. असे असतानासुद्धा प्रफुल पटेल यांच्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावरच्या दावेदारीने प्रफुल पटेल भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आधीच महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुरू असताना प्रफुल पटेल यांच्या भंडारा-गोंदिया लोकसभा जागेच्या मागणीने हा जागावाटपाचा तिढा लवकर सुटणार की नाही, असा प्रश्‍न पडला आहे.

Edited By : Atul Mehere

R

Praful Patel and Ajit Pawar
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीचे ‘मिशन जनरेशन नेक्स्ट’, अजित पवारांनी दिली संग्राम कोते पाटलांवर जबाबदारी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com