MLA Rohit Pawar in Yuva Sangharsha Yatra at Washim. Sarkarnama
विदर्भ

Washim : पुरोगामी विचारांसोबत राहिले असते, तर दादा लोकांचे मुख्यमंत्री झाले असते

जयेश विनायकराव गावंडे

Yuva Sangharsha Yatra : अजित पवार आणि त्यांच्याबरोबर काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दुःखी झालो. दादांमध्ये क्षमता आहे. पुरोगामी विचारांसोबत दादा राहिले असते, तर ते लोकांचे मुख्यमंत्री होऊ शकले असते, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा वाशिम येथे गुरुवारी (ता. 30) दुसरा दिवस होता. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपबरोबर जाणाऱ्या व्यक्तीचं ते कालांतरानं खच्चीकरण करतात, असं ते म्हणाले. (Ajit Pawar Would Have Been CM Of People If He Had Stayed With Progressive Thought Parties Says NCP Sharad Pawar Groups MLA Rohit Pawar At Washim)

भाजप त्यांच्याच तर लोकांची टप्प्याटप्प्यानं ताकद कमी करतेय, तर ते दादांना सोडतील का, असा प्रश्नही त्यांनी केला. ज्या नेत्यांनी अजितदादांच्या कानात सातत्यानं बोलून त्यांना हा निर्णय घ्यायला लावला, तेच आता दादांसोबत राहणार नाहीत असं दिसतंय. लवकरच ते भाजपसोबत जाऊ शकतात. कदाचित त्याची सुरुवातही छगन भुजबळ यांच्यापासून झाली असेल, असं आमदार पवार म्हणाले. 2014 मध्ये काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं चुका केल्या आहेत. लोकांना गृहीत धरायला लागतो की मतदार आपली ताकद दाखवतोच. त्याचा फायदा भाजपनं घेतला, असं त्यांनी सांगितलं.

भाजपनं त्यावेळी भ्रष्टाचाराबाबत प्रचार केला. त्यातून लोकांचा गैरसमजही झाला. नरेंद्र मोदी यांचीही लाट होती. त्यामुळं 2014 मध्ये सत्तेत येऊ शकलो नाही. काही काळ मुख्यमंत्री बदलून काही होऊ शकत नसतं, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. लोकांचा विश्वास असावा लागतो. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांचा पाच वर्षांतच अहंकार वाढला. आता लोकांना भाजप नकोशी झालीय. त्यांनाही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. 2024 मध्ये भाजपचं सरकार केंद्रात येईल असं कुणालाही वाटत नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना केल्या आहेत. मंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागतेय, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. यावरून मंत्री शेतकरी व सामान्यांना गृहीत धरताहेत हे सिद्ध होतं. असंच सुरू राहिलं तर मतदार लवकरच सत्ताधाऱ्यांवर रडण्याची वेळ आणल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT