Shivsena Leader Sushma Andhare.
Shivsena Leader Sushma Andhare.Sarkarnama

Sushma Andhare at Washim : शेतकऱ्यांसाठी सत्ताधाऱ्यांना वेळ नाहीये

Maha Prabodhan Yatra : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सरकारवर बरसल्या
Published on

Criticized Government : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे. शेती व सिंचनाशी निगडीत अनेक मुद्दे तापत आहेत. मात्र राज्यात सरकारला शेतकरी, शेतमजूर यांच्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. सत्ताधारी आपले खिसे भरण्यात व्यस्त आहे आणि शेतकरी त्रस्त आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

वाशीम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत त्या बुधवारी (ता. 22) त्या बोलत होत्या. (Shiv Sena Uddhav Thackeray Group's Leader Sushma Andhare Criticized Government At Washim For Not Giving Attention On Issues Of Farmer)

Shivsena Leader Sushma Andhare.
Nitin Gadkari At Washim : गडकरी म्हणाले, मी कुणाला फुकट मदत करत नाही; कारण...

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कुणाचेही नाव न घेता एक फोटो ट्वीट केला. लगेच भाजपाच्या नेत्यांनी युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हातातील काचेचा ग्लास असलेला फोटो ट्वीट करून तो कोणता ब्रँड आहे असा प्रश्न केला. अंधारे यांनी या प्रश्नाला सभेत प्रत्युत्तर दिले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सभेत दाखवत तो मोदी ब्रँड असल्याचा टोला भाजपा नेत्यांना लागवला.

काही बकरीचे बछडे जंगलात वाघासोबत खेळतात आणि स्वतःलाही वाघ समजतात. वाघाची खोळ अंगावर पांघरून कुणी वाघ होत नाही. वाघ तो वाघच असतो. ज्यांनी सध्या वाघाचे कातडे घातले आहे, ते ते बकरीचे बछडेही नाहीत, तर उंदीर आहेत, असा खोचक टोला अंधारे यांनी शिंदे गटाला लागवला. राज्यातील गृह मंत्रालय हे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्या ऐवजी विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी वापरल्या जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विकासासासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष विधानसभेत आवाज तर उठवेलच त्याबरोबर रस्त्यावरची लढाई लढेल अशी ग्वाही अंधारे यांनी दिली. महिला आयोगाच्या अध्यक्ष या देखील एक महिला आहेत. मात्र अलीकडच्या काळात त्या आपण महिला आहोत हे विसरल्या आहेत. त्या जर ही बाब विसरत असतील तर त्यांना आम्हाला आठवण करून द्यावी लागेल, असा टोला त्यांनी लागवला. वाशीम जिल्ह्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत. शिवसेना या प्रश्नांवर प्रसंगी रस्त्यावर उतरून सामान्यांची लढाई लढेल, असा शब्दही सुषमा अंधारे यांनी दिला. माजी मंत्री संजय देशमुख, जिल्हा प्रमुख सुधीर कवर, समन्वयक सुरेश मापारी, गजानन देशमुख, माणिकराव देशमुख सभेला उपस्थित होते.

Edited by : Prasannaa Jakate

Shivsena Leader Sushma Andhare.
भर सभेत Sushma Andhare यांची घोषणा, 'हा' असणार Santosh Bangar यांच्या विरोधातला उमेदवार | Shivsena

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com