Maharashtra Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics : महायुती, आघाडीला रोखण्यासाठी परिवर्तन आघाडी मैदानात?

योगेश फरपट

Maharashtra Political News : राज्यात महायुती व महाविकास आघाडीला रोखण्यासाठी परिवर्तन आघाडी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती व महाविकास आघाडी विरोधात शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पार्टी सोबतच जिल्हा व गाव पातळीवरील शेतकरी संघटनांना एकत्र घेऊन परिवर्तन आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारणात मोठा ट्विस्ट होणार असल्याचीच चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्व मुक्तीवादी संघटनांना एकत्रित करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे Lalit Bahale यांनी केली आहे. ते स्वतःही अकोला Akola जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

राज्य विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आलेला आहे. विधानसभा पुनर्गठित करण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. निवडणुकीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित राजकीय समुहांनी संगठित केलेल्या युती - आघाडीच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या संघटना आपापल्या सत्ता काळात अवलंबलेल्या धोरणाने उत्पादक श्रम, शेती, उद्योग, सेवा- उद्योग, अनुसंधान या सर्व क्षेत्रातील उद्योजकता क्षीण पावत असल्याकडे ललित बहाळेंनी लक्ष वेधले.

संपत्ती निर्माण करणाऱ्या सर्व सामाजिक घटकांविरूद्ध विविध प्रकारे निर्बंध किंवा जाचक कर प्रणाली विकसित केली आहे. महसूल निर्मितीची विविध साधने निर्माण करून एकूणच अर्थव्यस्थेला घातक अशाप्रकारे खर्च करणे याचा सपाटाच लावला आहे.

राजकारणाचे स्वरूप सत्ताकारणात रुपांतरीत करून स्थापित करण्यात आले आहे. धोरणाने उद्भवलेल्या समस्यांचे समाधान अर्थसंकल्पीय तरतुदीने करण्याच्या उपदव्यापामुळे अर्थार्जनाची साधने विकसित होण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे, असा आरोपही ललित बहाळेंनी केला.

बेरोजगारी, आरक्षणविषयक जातीय अस्मिता, नोकरशाहीचा हैदोस अशा एक ना अनेक वित्तीय, आर्थिक, सामाजिक अवस्थेला समाज समोर जात आहे. या सर्व परिस्थितीतून जनलेला दिलासा देण्यासाठी परिवर्तन आघाडी काम करणार आहे, बहाळेंनी स्पष्ट केले.

एकत्र येण्याचे आवाहन

जिल्ह्यातीलच नव्हेतर राज्यातील मुक्त चळवळीत सहभागी असलेल्या सर्व समविचारी पक्ष, संघटनांनीही आमच्यासोबत यावे, असे आवाहन ललित बहाळे यांनी केले आहे. परिवर्तन आघाडी धोरणात्मक परिवर्तनाचा पर्याय आहे. सत्ता परिवर्तन म्हणून नाही. राज्यात महायुती-महाआघाडीच्या धोरणाने ग्रस्त असलेल्या सर्व पक्ष-संघटनांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT