Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar  Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : राष्ट्रवादीशी जुळवून घेतल्यास ॲड. प्रकाश आंबेडकरांना नामी संधी! पण...

Ncp News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये एक प्रयोग केला होता.

Atul Mehere

Akola Lok Sabha Constituency : पश्‍चिम विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीला काबिज करायचा असल्यास पूर्वापार कॉंग्रेसला दिली जात असलेली उमेदवारी यावेळी शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) द्यावी लागेल. येथे शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पुढे केल्यास, महाविकास आघाडी २०२४ मध्ये हा मतदारसंघ भाजपकडून (BJP) हिसकावून घेऊ शकते.

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) उमेदवार राहणार नाही, असे महाविकास आघाडीत जवळपास ठरलेले आहे. कारण येथे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेला वाद आडवा येतो. हा वाद काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण हा वाद मिटला आणि उमेदवार आंबेडकर असले तरच येथे महाविकास आघाडीला विजय मिळणार आहे, अशी एकंदर स्थिती सध्या आहे. राजकारणात प्रयोगशील नेते म्हणून ख्यातनाम असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये एक प्रयोग केला होता.

काय आहे प्रकाश आंबेडकर-राष्ट्रवादीचा वाद?

पवारांनी १९९९ मध्ये रा. सू. गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणले होते. त्यावेळी त्यांनी त्या-त्या जागांवर विजय मिळविला होता. प्रा. जोगेंद्र कवाडे नागपूरचे खासदार झाले होते. रा. सू. गवई अमरावती, तर प्रकाश आंबेडकर अकोल्याचे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर पवारांनीच आंबेडकरी नेत्यांमध्ये फूट पाडल्याची भावना प्रकाश आंबेडकरांची झाली आहे.

अकोल्याची जागा पाडण्यासाठी नेहमी राष्ट्रवादीच आपला 'गेम' करते, असाही त्यांचा समज आहे. तेव्हापासून ते शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध करतात, असे सध्यातरी वरवर दिसणारे हे कारण आहे. आंबेडकरी नेत्यांमध्ये फुट पडल्यानंतर कवाडे स्वतंत्र झाले. रामदास आठवले आधी शिवसेनेत आणि नंतर भाजपमध्ये गेले. प्रकाश आंबेडकरही स्वतंत्र झाले आणि नंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि वंचितचे उमेदवार म्हणून लढले तर आंबेडकरांना खासदार होण्याची ही नामी संधी आहे.

हिंदुत्ववादी मतदार भाजपकडे वळला तरीही शिवसेनेचा परंपरागत हिंदुत्ववादी मतदार आंबेडकरांकडे वळेल आणि महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची परंपरागत मते आहेतच. त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीला येथे विजयाची पूर्ण संधी आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमुठ अखेरपर्यंत घट्ट असणे गरजेचे आहे. असे गणित जुळले तर प्रकाश आंबेडकरांना नामी संधी असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT