Akola Lok Sabha 2024 Sarkarnama
विदर्भ

Akola Lok Sabha 2024: तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? अनुप धोत्रेंना ग्रामस्थांनी विचारला जाब

Akola Lok Sabha Election 2024: संजय धोत्रे हे भाजपच्या तिकिटावर येथून चार वेळा निवडून आले आहेत. आता त्यांचा मुलगा अनुप धोत्रेंना भाजपने उमेदवारी दिली आहे. प्रकृती बरी नसल्याने संजय धोत्रेंनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Akola News:अकोला लोकसभा मतदारसंघाचे (Akola Lok Sabha 2024) विद्यमान खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) मतदारसंघात फारसे दिसून न आल्याने त्यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करताना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघात येतो. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले असता, त्यांना नागरिकांनी दहा वर्षांत काय केले ? तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? आता तुम्ही निधी दिल्याचे सांगता, त्यामुळे तुम्हाला आम्ही मतदान का करावे ? असा जाब ग्रामस्थ विचारत आहेत.

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीचं केंद्रस्थानही आहे.

संजय धोत्रे हे भाजपच्या तिकिटावर येथून चार वेळा निवडून आले आहेत. आता त्यांचा मुलगा अनुप धोत्रेंना भाजपने उमेदवारी दिली आहे. प्रकृती बरी नसल्याने संजय धोत्रेंनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. वंचितनं प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी अकोल्यातून जाहीर केली आहे.

अनुप धोत्रे यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा प्रचार सुरू आहे. मतदारांशी गाठीभेटी घेताना संजय धोत्रे यांनी आमच्यासाठी काहीही काम केले नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यांच्या प्रचार रॅलीत संजय धोत्रे नसल्याने नागरिक अनुप धोत्रेंवर रोष व्यक्त करीत आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT