BJP Election 2024 Strategy: लोकसभेची खरी लढाई बूथवर; मैदानावरील सभेपेक्षा चौक सभा, बैठक घेण्यावर भाजपचा भर

Maharashtra Lok Sabha Election 2024: सभेसाठी गर्दीचे नियोजन करणे, वाहतूक याच्यात पक्षाची शक्ती खर्च होते, त्यासाठी भाजपने सभाऐवजी बूथ व्यवस्थापन मजबूत करण्यावर भर दिला आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

विनोद राऊत

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपने लोकसभेसाठी रणनीती (BJP Election Strategy) आखली आहे. 'अब की बार चार सौ पार' हेतू प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा वगळता भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होताना दिसत नाहीत. कारण सभेसाठी गर्दीचे नियोजन करणे, वाहतूक याच्यात पक्षाची शक्ती खर्च होते, त्यासाठी भाजपने सभाऐवजी बूथ व्यवस्थापन मजबूत करण्यावर भर दिला आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर (Maharashtra Lok Sabha Election 2024) होण्यापूर्वी भाजपने पक्षाचे बूथ व्यवस्थापन अधिक मजबूत आणि सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले होते.

बूथप्रमुख, पन्ना प्रमुख तसेच शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या होत्या. आतापर्यंत पक्षाने बूथप्रमुखांच्या दोन ते तीन बैठकाही घेतल्या आहेत. मतदारांची ए,बी,सी अशी वर्गवारी करणे. यात भाजपच्या कन्फर्म मतदाराला ‘ए’, भूमिका अस्पष्ट असलेल्याला ‘बी’ तर प्रतिकूल असलेल्या मतदाराला ‘सी’ नामांकन दिले जाते. या यादीनुसार कार्यक्रम आखले जात आहेत.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीच्या रडारवर भाजपचे चाळीस मतदारसंघ; 'चार सौ पार'चे गणित बिघडविणार...

या वेळी लोकसभेची खरी लढाई बूथवर खेळली जात असल्याचे चित्र आहे. अनेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरतानाही गर्दी करण्याचेही पक्षाने टाळले. गर्दी जमवण्यावर शक्ती खर्च करण्यापेक्षा चौक सभा, बैठका घेण्यावर करा, असा स्पष्ट आदेश पक्षाने दिला असल्याची माहिती आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com