Akola Mayor Election Sarkarnama
विदर्भ

Akola Mayor Election : सत्तेसाठी सगळं विक्रीला! तीन कोटींचा दर, दुकानांची बोली… अकोल्यात भाजपचा सत्ताबाजार उघड!

Akola Mayor–Deputy Mayor Election: ShivSenaUBT & Congress Attack BJP Over Power Politics : अकोला महापालिकेतील भाजपने केलेल्या सत्ताबाजारावर शिवसेना ठाकरे सेना पक्ष आणि काँग्रेसने सडकून टीका केली आहे.

Pradeep Pendhare

Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेतील भाजपच्या सत्ताबाजारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल चढवला आहे.

या पत्रकार परिषदेत त्यांनी, भाजपचे सत्तासाठी असलेल्या हिंदुत्वावर टीका केली. बहुमतासाठी सात नगरसेवकांना तीन कोटी रुपये दिला. यात मुस्लिम नगरसेवकांचा समावेश आहे. तसंच अकोल्याच्या जनता भाजी बाजारात दुकान देण्याचं देखील सत्ताधारी भाजपने आश्वासन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. विरोधकांच्या या आरोपांनी अकोल्यातल्या राजकारण खळबळ उडाली आहे.

अकोला (Akola) महापालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौरपदावर बाजी मारली आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि वंचित पक्षाचे सर्व प्रयत्न फेल ठरले. पण भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांची मोट बांधली, अन् सत्ता स्थापनेच यश खेचून आणलं.

या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि 'AIMIM' पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. या निवडीत 'AIMIM' पक्षाचे नगरसेवक तटस्थ राहिले. यावरून काँग्रेसचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने-सामने येऊन, जोरदार राडा झाला.

भाजपच्या आदेशानुसार आम्ही नगरसेवक तटस्थ राहिले, असा आरोप करत, काँग्रेस नगरसेवकांनी अंगावर बांगड्या फेकल्या, आम्हाला सभागृहातच धमक्या दिल्या, असे 'AIMIM' पक्षाच्या नगरसेवकांनी आरोप केले. 'AIMIM 'पक्षाच्या तटस्थ राहण्याच्या भूमिकेचा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या नगरसेवकांनी निषेध केला आहे.

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत झालेल्या राड्यावरून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, भाजपचे सत्तेसाठी असलेल्या हिंदुत्वावर जोरदार हल्ला चढवला.

साजिद खान पठाण यांचा हल्लाबोल...

आमदार साजिद खान पठाण यांनी, भाजपने अकोला महापालिकेत मुस्लिमांच्या आशीर्वादाने सत्ता स्थापन केली. भाजपने सात नगरसेवकांना तीन कोटी रुपये दिले. तसंच अकोल्याच्या जनता भाजी बाजारात प्रत्येकाला दुकान देण्याचं आश्वासन दिलं आहे, असा गंभीर आरोप केला. साजिद खान पठाण यांच्या या आरोपामुळे अकोल्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

नितीन देशमुख म्हणाले...

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी देखील भाजपच्या सत्तापिपासू राजकारणावर हल्ला चढवला. निवडणुकांच्या तोंडावर भाजप 'कटेंगे तो बटेंगे'चा नारा देतात. मात्र भाजपने मुस्लिमांच्या भरवशावर सत्ता राखली. सत्तेसाठी भाजप ही AIMIMला सोबत घेत आहे. भाजप आणि AIMIM पक्षाच्या युतीचा पहिला फंडा अकोट नगरपालिकेमध्ये दिसून आला होता, आज तर अकोला महापालिकेत 'AIMIM'ला तटस्थ राहण्याची भूमिका, भाजपनेच सांगितली, असा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT