Akola Sarkarnama
विदर्भ

Akola News : बळजबरीने केले मुलाचे धर्मांतर, पहाटे पावणे तीन वाजता घेतली आईची तक्रार, अकोल्यात खळबळ !

Conversion : चौघांनी १९ वर्षीय मुलाचे जबरदस्तीने धर्मांतर केले.

सरकारनामा ब्यूरो

Mother lodged a police complaint : हैदराबादला नोकरी लावून देतो, असे सांगून चौघांनी १९ वर्षीय मुलाचे जबरदस्तीने धर्मांतर केले आणि त्याला मदरशामध्ये ठेवले. खूप पायपीट केल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली. या घटनेने अकोला जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. (It is said that he was sent for a job in Hyderabad)

गत चार महिन्यांपासून माझा मुलगा शुभम याला चौघांनी कुठेतरी नेले आहे. विचारणा केली असता ते त्याला हैदराबाद येथे नोकरीसाठी पाठविल्याचे सांगतात. पण मुलाचा फोन लागत नाही. आम्ही हैदराबाद येथील पत्त्यावर गेलो असताना तेथेही तो आढळला नाही. पुन्हा आम्ही त्यांच्याकडे विनवणी केली. पण त्यांचे उत्तरे उडवाउडवीची होती. नंतर मुलगा बुलढाणा जिल्ह्यातील उंद्रीच्या मदरसात असल्याचे कळले.

तेथून त्याला परत आणले. तेव्हा कळले की, त्यांनी माझ्या मुलाचे धर्मांतर केले आहे, अशी आर्त तक्रार आलेगाव येथील ज्योती दाभाडे यांनी चान्नी पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव येथे दाभाडे कुटुंबीय राहतात. कुटुंबात पती-पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी. सर्वात मोठा मुलगा असलेला शुभम हा १९ वर्षांचा आहे.

तीन महिन्यांपूर्वी शुभम हा अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले, शेख तन्वीर शे. अजीम शे. मंजूर आणि इतर दोघांच्या संपर्कात आला. त्याला फूस लाऊन हैदराबाद येथे कामाला नेतो, असे म्हणून त्याला बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील उंद्री येथील मदरसात ठेवले. बरेच दिवसांत मुलाचा फोन न आल्याने ज्योतीने अल्ताफ अन्सार व संबंधिताकडे विचारणा केली. ती हैदराबाद येथे गेली. तेथून तिने मुलाला फोन केला असता त्याने फोन घेतला आणि तू घरी जा असे सांगून बंद केला.

पुन्हा काही दिवसांनी ज्या फोनहून त्याचा फोन आला त्यावर विचारणा केली असता तो क्रमांक उंद्री येथील मदरशाचा असल्याचे कळले. आम्ही लगेच तेथे पोहोचलो आणि त्याला घेऊन आलो. पण शुभम नेहमीच त्याच्याच तंद्रीत राहत होता. त्यामुळे आम्ही काय करावे असे विचारात असतानाच त्याच्या पॅंटच्या खिशात पाहिले असता एक दस्तऐवज आढळला. त्यावर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याबाबतचा मजकूर होता. ते पाहून आमच्या पायाखालची वाळू सरकली.

याबाबत गावातील अल्ताफ, अन्सार गादीवाले, शे. तन्वीर, शे. अजीम शे. मंजूर या सर्वांना विचारणा केली असता त्यांनी तुमचा मुलगा मुस्लिम धर्मात आला आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला आम्ही पैसे देतो. तुम्ही अन्य कुटुंबीय मुस्लिम धर्मात या असे म्हटले. त्यानंतर आम्ही तेथून परतलो.

त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास अल्ताफ, अन्सार गादीवाले, शे. तन्वीर, शे. अजीम शे. मंजूर हे घरी आले आणि त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करून धर्म परिवर्तन करा, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार ज्योती दाभाडे यांनी बुधवार, ता. १२ जुलै रोजी पहाटे पावणे तीन वाजता नोंदविली. या घटनेनंतर अकोला (Akola) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, धर्मांतराच्या या प्रकाराबाबत निषेध व्यक्त होत आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

आलेगाव येथील ज्योती दाभाडे यांनी मुलाचे धर्मांतर केले असा आरोप करीत चान्नी पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी दुपारी १२ वाजतापासून त्या तक्रार दाखल करण्यासाठी चान्नी पोलिस ठाण्यात बसल्या होत्या. त्यांची तक्रार बुधवार, १२ जुलै रोजी रात्री उशिरा पावणे तीनला दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत अल्ताफ, अन्सार गादीवाले, शे. तन्वीर, शे. अजीम शे. मंजूर यांना अटक केली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT