Akola Farmers News : बियाणांसाठी शिवसेना आक्रमक, कृषी अधिकाऱ्याच्या दालनातच केली घोषणाबाजी...

Minister of Agriculture : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शिवसैनिकांना जोरदार घोषणाबाजी केली.
Agitation of Shivsena
Agitation of ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

The problems facing the farmers are increasing : खरीप हंगामात पेरणीसाठी बी- बियाणे व खतांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत आहेत. ते बघता कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याच्या निषेधार्थ अकोला जिल्हा शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी अधीक्षकांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. (A protest was held in the hall of the Agriculture Superintendent)

सत्ताधारी व कृषिमंत्र्यांच्या विरोधात शिवसैनिकांना जोरदार घोषणाबाजी केली. मॉन्सूनचा पाऊस महिना झाला तरी आलेला नाही. अशात खरीप हंगामातील पेरणीसाठी तयारी करीत असलेल्या शेतकऱ्यांना योग्य व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे व खतांसाठीही अडचणीचा सामना करावा लागत आहे.

गुणवत्तेच्या नावाखाली अकोला जिल्ह्यात तपासणी मोहीम राबवणाऱ्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात योग्य बियाणे आणि खतांचा पुरवठा होईल, या दृष्टिकोनातून कोणतेही प्रयत्न व नियोजन केल्याचे दिसून येत नाही. शेतकऱ्यांना हवे असलेल्या बियाण्यांसोबत इतर वाण घेण्याची सक्ती केली जात आहे.

बियाणे लिंकिंग रोखण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना माहिती देवून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्याचा रोष म्हणून बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कृषी अधिकारी अकोला यांच्या कार्यालयात दुपारी हे आंदोलन केले. यावेळी कार्यालयात कृषी अधिकारी शंकर किरवे उपलब्ध नसल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या भेटीचा आग्रह धरीत त्यांच्या दालनातच आंदोलन व घोषणाबाजी सुरू केली.

Agitation of Shivsena
Akola District News : ‘वाण’ला विरोध करणारे आमदार पडले तोंडघशी, नितीन देशमुखांच्या 'त्या' मोर्चाला यश मिळतंय !

या आंदोलनात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, विकास पागृत, शहर प्रमुख राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, जि.प. सदस्य गोपाल भटकर, डॉ. प्रशांत अगाऊ, योगेश गीते, सुरेंद्र विसपुते आदींसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शेतकऱ्यांना (Farmers) हवे असलेले सोयाबीन व कपाशीचे बियाणे उपलब्ध नाही. लिंकींग करून बियाणे विक्री केली जात आहे. हव्या असलेल्या बियाण्यांसोबत इतर वाण घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यावर कृषी विभागाचे नियंत्रण नाही. कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे सरकारचा व कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले असल्याचे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी सांगितले.

Agitation of Shivsena
Akola Raid News: कृषी विभागाच्या 'त्या' छापेमारीवर मंत्री सत्तारांची सारवासारव; खंडणीसह शिवीगाळ, मारहाणीचाही पथकावर आरोप

यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना विचारणा केली असता, अकोला (Akola) जिल्ह्यासाठी एकूण 10 लाख पाकिट मंजूर करण्यात आले. एकाच वाणाची मागणी वाढली. त्यामुळे बियाणे वितरणात अडचण आली. बियाणे लिंकिंग रोखण्यासाठी दुकानांची तपासणी केली जात आहे. कंपनी लिंकिंग करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार मला आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बियाणे विक्री केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com