Dhangar Reservation  Sarkarnama
विदर्भ

Dhangar Reservation News : मिटकरींच्या विरोधात धनगर समाज आक्रमक; 'घासलेट चोर' असं लिहिलेल्या मिटकरींच्या प्रतिमेला जोडे मारले...

जयेश गावंडे

Akola : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष थांबलेला नाही. काही दिवसांपूर्वी पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या विधानाला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार प्रतिउत्तर दिलं होतं. त्यांचा निषेध आज (रविवारी) अकोल्यात सकल युवक धनगर समाज संघटनेने केला. मिटकरींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.

भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सध्या सत्तेत एकत्र आहे. मात्र, पडळकर आणि राष्ट्रवादीचा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी अजितदादांवर केलेल्या विधानावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं होतं.

मिटकरी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत, पडळकरांवर खालच्या शब्दांत टीका केली होती. "पडळकरांना तुम्ही वेळीच आवर घाला, वेसण घालावी.. अन्यथा आम्हाला आवर घालावा लागेल," असा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचा निषेध नोंदवत धनगर समाजातील युवक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मिटकरींच्या विरोधात आंदोलन केले.

मिटकरी यांच्या प्रतिमेला युवकांनी जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मिटकरी यांच्या प्रतिमेवर 'घासलेट चोर' असं लिहिलं होतं. दरम्यान, युवकांनी मिटकरींनी पडळकरांच्या विरोधात केलेल्या विधानाचा जोरदार निषेध नोंदवला. आंदोलनात सुमित नवलकार, रविराज घोंगे, विठ्ठल कवळकार, भाग्येश पांडे, अनिल बाहे, विक्की बोरसे, अविनाश कोकरे, कृष्णा दाभाडे, ऋषी उगले, प्रशांत भिवटे, महेश पातोंड, सोनु देशमुख आदी सहभागी झाले होते.

काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात भाजयुमोचा पदाधिकारी सहभागी झाला होता. त्याच पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आज अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT