This meeting will be held on September 2 : राजकारणात पदासाठी कोण, केव्हा, कुठे जाईल याचा काही नेम नसतो. मागील काळात झालेल्या घडामोडींवरूनही हेच लक्षात येते. अकोला पूर्वमधून भारिप-बहुजन महासंघ व विद्यमान वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आलेले आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप असा प्रवास केलेले हरिदास भदे आता शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वाटेवर आहेत. (Uddhav Thackeray was asked for an appointment)
मुंबई येथे काल (ता. २२) ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली असून, दोन सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार हरिदास भदे हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन भारिप-बहुजन महासंघ व विद्यमान वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आले होते.
सन २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. सन २०१४ च्या निवडणुकीत त्यांना भाजपचे रणधीर सावरकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. २०१९ मध्येही ते पराभूत झाले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तेथे त्यांचे मन रमले नाही.
सिरस्कार यांनी यापूर्वीच राकाँला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता माजी आमदार हरिदास भदेही लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राकाँला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी मंगळवारी (ता. २२) शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीत माजी आमदार भदे यांनी पक्ष प्रवेशावर चर्चा करण्यासाठी वेळ मागवून घेतली आहे. त्यानुसार २ सप्टेंबर रोजी त्यांची पक्ष प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा होणार असून, त्यानंतर पक्ष प्रवेशाची तारीख ठरविली जाणार असल्याची माहिती आहे. माजी आमदार हरिदास भदे हे शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत. मुंबई (Mumbai) येथे त्यांनी भेटीसंदर्भात वेळ मागितली आहे. पुढच्या भेटीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा होईल.
तोपर्यंत ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गोपाल दातकर यांनी सांगितले. शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. अद्याप पक्ष प्रवेश घेतला नाही. पुढील बैठकीत चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे माजी आमदार हरिदास भदे म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.