Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेत अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत युती केल्यास किती फायद्याची राहील, याबाबत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून कानोसा घेतला.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे स्वत: घेत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना महत्वाच्या सूचना देखील ते देत आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करत असून आता ठाकरेंनी देखील लोकसभेसाठी रणनीती आखण्यात सुरवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची ताकद किती महत्त्वाची आहे, याबाबतही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती राहिल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडी मागण्याची शक्यता आहे. यासंदर्भाने देखील ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे बोलले जाते. असे असले तरी अद्याप याबाबत कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतानाच ठाकरेंनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. भाजपने आपल्या सोबत गद्दारी केल्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आदेशही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.