Sadabhau Khot with Ravikant Tupkar At Buldhana. Sarkarnama
विदर्भ

Buldhana Ravikant Tupkar : पोटात अन्न नसलेल्या तुपकरांची पोलिसांना वाटतेय भीती

Protest For Farmer : उपोषणस्थळाला भेट देत नेते म्हणताहेत आम्ही एक आहोत

जयेश विनायकराव गावंडे

Will Besiege The Ministry : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले रविकांत तुपकर यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सोमठाणा येथे सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाला पक्षीय राजकारण बाजूला ठेवत विविध नेत्यांनी व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सोमवारी (ता. 27) शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही सोमठाणा गाठले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी रविकांत तुपकर यांनी उभारलेला लढा मोठा आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न जेव्हा जेव्हा येईल, तेव्हा तेव्हा आम्ही सर्व एकत्र येऊ, असं खोत या वेळी म्हणाले. सध्या पोटात अन्न नसल्यानं तुपकर सोमठाण्यातील उपोषण मंडपात पूर्णवेळ झोपून असले तरी त्यांची प्रचंड धास्ती पोलिसांनी घेतली. (All Party Leaders Supported Ravikant Tupkar's Protest & Hunger Strike For Farmers in Somthana Village Of Buldhana)

तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसल्याने अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी यापूर्वीही दीर्घकाळापर्यंत उपोषण केलं होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. तुपकर यांच्या मातोश्री उपोषण मंडपात आल्या, तेव्हा त्यांना अश्रूही अनावर झाले होते. या भावूक क्षणानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केलं होतं. त्यानंतर तुपकरांची प्रकृती पाहता अनेकांनी त्यांना असं अन्नत्याग आंदोलन करू नका, असा प्रेमाचा व आग्रहपूर्वक सल्ला दिला होता. मात्र, यंदा त्यांनी पुन्हा अन्नत्याग केल्यानं त्यांचे समर्थक चिंतेत आहेत.

बुधवारी (ता. 29) तुपकर यांनी मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं त्यांना बुलडाणा पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयानं जामिनावर मुक्तता केल्यानंतर तुपकर सध्या सोमठाणा गावात आहेत. त्यांनी इशारा दिल्याप्रमाणं मुंबईतील त्यांचं नियोजित आंदोलन काही तासांवर येऊन ठेपलं आहे. ‘गनिमी कावा’ या शब्दाचा तुपकरांनी वापर केल्यामुळं ते कोणत्याही क्षणी भूमिगत होतील व मंत्रालयावर धडक देतील, अशी भीती पोलिसांना वाटत आहे. त्यामुळं पोलिस तुपकर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर सतत पाळत ठेऊन आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डोळ्यात तेल घालत पोलित तुपकर आणि समर्थकांच्या मागावर आहेत. आंदोलनाची घोषणा केल्यानंतर तुपकर अचानक भूमिगत होतात, असा पोलिसांना नेहमीचा अनुभव आहे. यापूर्वीही त्यांनी सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयापुढं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवानं पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं. ही आंदोलनं एका विशिष्ट स्थळापुरती मर्यादित होत. मात्र, यंदा तुपकरांनी मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा दिला. त्यामुळं त्यांच्यावर कडक ‘वॉच’ ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी बुलडाणा जिल्हा पोलिसांची आहेत. अशात ‘नजर हटी और दुर्घटना घटी’ असा प्रकार पोलिसांकडून झाल्यास मंत्रालयातून कोणाकोणाला बत्ती बसेल याचा नेम नसल्यानं पोलिस धास्तावले आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT