Ravikant Tupkar with his Daughter Yadnyaja at Buldhana.
Ravikant Tupkar with his Daughter Yadnyaja at Buldhana.Sarkarnama

Buldhana Ravikant Tupkar : 'यज्ञजा... घाबरायचं नाही, शेतकऱ्यांची लढाई लढायचीय !'

Police Action : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांचा कन्येशी भावनिक संवाद
Published on

Farmer's Protest : ‘यज्ञजा... अजिबात घाबरायचं नाही. आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्याला शेतकऱ्यांची लढाई लढायचीय. काळजी करू नको... मी लवकरच येतो..., मग आपण शेतकऱ्यांसाठी आणखी मोठा लढा देऊ...’ असा भावनिक संवाद शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि त्यांची कन्या यज्ञजा यांच्यात बुलडाणा येथे झाला.

तुपकर यांना पोलिसांनी शनिवारी (ता. 25) नोटीस बजावली. मंत्रालयावर ताबा घेण्याच्या त्यांच्या इशाऱ्यामुळं कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळं आंदोलन करू नका. तसा प्रयत्न कराल तर कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी नोटीसमध्ये दिला होता. (Buldhana Police Detained Farmer's Leader Ravikant Tupkar After His Warning To Protest At Mumbai Mantralaya)

Ravikant Tupkar with his Daughter Yadnyaja at Buldhana.
Buldhana Ravikant Tupkar : मंत्रालयात मंत्री काय अंडी उबवायला बसलेत का?

पोलिसांनी कलम 149 नुसार नोटीस बजावल्यानंतरही रविकांत तुपकर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही बाब वरिष्ठ पातळीवर कळविली. त्यानंतर आदेश प्राप्त होताच बुलडाण्याचे पोलिस उपअधीक्षक गुलाबराव वाघ, ठाणेदार प्रल्हाद काटकर आपल्या ताफ्यासह तुपकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. त्यांनी तुपकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनाच्या भूमिकेवर तुपकर ठाम राहिल्यानं त्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं.

तुपकरांना ताब्यात घेताच त्यांची कन्या यज्ञजा त्यांना बिलगली. त्यामुळं तुपकर यांनी तिच्याशी काही क्षण संवाद साधला. ‘आपल्याला शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लढायची आहे. त्यामुळं घाबरून चालणार नाही. असं होतच राहणार आहे. मी पण घाबरत नाही, तू पण घाबरू नको. मी लवकरच येतो. त्यानंतर आपण आणखी ताकदीनं शेतकऱ्यांसाठी लढूया’, असं ते या वेळी कन्येला म्हणाले. पोलिस घरात आल्यापासून यज्ञजा आपल्या वडिलांजवळच होती. पोलिस तुपकर यांना घेऊन जात असताना ती पूर्णवेळ त्यांना बिलगूनच होती.

पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है..’ अशा घोषणांनी परिसर दणाणला. कारवाई सुरू असताना तुपकर यांच्या घराच्या परिसरात चांगलीच गर्दी जमली होती. परंतु पोलिसांनी कुणालाही परिसरात प्रवेश दिला नाही. नोटीस बजावल्यानंतर पोलिस कोणत्याही क्षणी तुपकर यांना ताब्यात घेतील, ही बाब निश्चित होती. त्यामुळं पोलिस आणि आंदोलक दोघेही तयारीत होते. 29 नोव्हेंबरला अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. अशात त्यापूर्वीच तुपकरांना ताब्यात घेण्यात आल्यानं त्यांना चार दिवस पोलिस आपल्या ताब्यात ठेवतील, असं सांगण्यात येत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Ravikant Tupkar with his Daughter Yadnyaja at Buldhana.
Buldhana News : रविकांत तुपकरांचा सरकारला अल्टिमेटम, अन्यथा मंत्रालयाचा ताबा घेणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com