Crime, Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Cheating With MLA: निरजसिह राठोडला आज आणणार नागपूरात, तीन आमदारांकडून घेतले पैसे?

Nagpur Police : तीन आमदारांकडून पैसे लाटल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

सरकारनामा ब्यूरो

Vidarbha's Two MLAs Was Chitting By Rathod: मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लावून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या तोतया स्वीय सहायकाला अहमदाबादेतील मोरबी येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन नागपूरकडे रवाना झाले असून आज ते शहरात पोहोचणार आहे. (The police team took him and left for Nagpur)

आतापर्यंत त्याने तीन आमदारांकडून पैसे लाटल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. तोतया स्वीय सहायकाने महाराष्ट्रासह गोवा आणि नागालँडमधील आमदारांनाही पैसे मागितल्याचे समोर आले आहे. ‘महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील’, असे सांगून नीरजसिंग राठोड याने मध्य नागपूरचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ अहमदाबादेतील मोरबी येथे पथक पाठवून त्याला अटक केली. नीरजसिंग हा टाईल्स विक्रेता असून त्याने एकट्याने हे केले की यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, त्याने सहा आमदारांना लाखो रुपये मागितले होते. तीन आमदारांनी त्याला पैसे दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाईल विक्रेत्यामार्फत घेतले पैसे?

नीरजसिंग राठोड याने आमदार विकास कुंभारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी एका कार्यक्रमासाठी १ कोटी ६७ लाख देण्यास सांगितले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) हे प्रमुख अतिथी असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, गुजरातमध्ये (Gujrat) एका मोबाईल दुकानदाराच्या खात्यावर ते पैसे ‘आरटीजीएस’मार्फत पाठविण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सायबर पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे.

फसवणुकीत या आमदारांचा आहे समावेश..

पोलिसांनी (Police) नीरजला अटक केली. त्याची प्राथमिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नीरजने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुले, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा (Goa) येथील प्रवीण आर्लेकर व नागालँडचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT