Bachchu Kadu controversy Sarkarnama
विदर्भ

BJP complaint Eknath Shinde : बच्चू कडूंवर भाजप आमदार भडकले; एकनाथ शिंदे तंबी देणार?

Bachchu Kadu Bold Statement on Breaking Radhakrishna Vikhe Car BJP Files Complaint to Eknath Shinde Amaravati News : भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू लोकांची डोके भडकावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Rajesh Charpe

Bachchu Kadu controversy : वादग्रस्त आणि धाडसी वक्तव्ये करून माजी आमदार बच्चू कडू नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या टिपणीवर न्यायालयानेसुद्धा त्यांना फटकारले होते.

आता कडू यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू लोकांची डोके भडकावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अलीकडेच शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन केले. त्यांच्या आंदोलकांनी दोन दिवस महामार्ग रोखून ठेवला होता. त्यामुळे मोठी कोंडी नागपूरमध्ये झाली होती. उच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेऊन त्यांना रस्ता रिकामा करण्याचे आदेश दिले होते. या न्यायालयाच्या आदेशावर कडू नाराजी व्यक्त केली होती.

न्यायालयाने कोंडीची दखल घेतली, मात्र शेतकऱ्यांची (Farmer) घेत नाही, असे मत यावर व्यक्त केले होते. आम्ही जनतेच्या न्यायालयाचा आदेश मानू, असे सांगून त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेश मानणार नाही, असे सूचित केले होते. त्यानंतर कडू यांनी माफी मागितली असली तर, न्यायालयाने त्यांचा चांगलेच फटकारले. तुम्ही किती वेळा शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन लढा दिला, अशी विचारणा करून बोलताना मर्यादा ठेवण्यास त्यांना सांगण्यात आले होते.

या वाद संपला असताना आता कडू यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखो पाटील यांची गाडी फोडण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देताना बक्षीसही जाहीर केले आहे. यावर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश करायचा आहे, याकतरिता ते आपले लक्ष वेधून घेत असल्याचा दावा त्यांचे अमरावती येथील प्रतिस्पर्धी आमदार रवी राणा यांनी केला आहे. भाजपचे आमदार प्रवीण तायडे हेसुद्धा बच्चू यांच्यावर भडकले आहेत. कडू यांच्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते असे सांगून तायडे यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आह.

विखे पाटील अनुभवी आमदार, मंत्री आहेत. कडू राजकीय मर्यादांचे उल्लंघन करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तायांना तंबी द्यावी अशी मागणी तायडे यांनी केली आहे. बच्चू कडू महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा कडू हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.

विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय कडू यांनी घेतला. महायुतीच्या अनेक उमेदवारांच्या विरोधात त्यांनी आपल्या प्रहार संघटनेचे उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत कडू यांच्यासह त्यांचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. त्यानंतर कडू यांनी पुन्हा आपल्या आंदोलकाच्या भूमिकेत शिरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT