Ambadas Danve Sarkarnama
विदर्भ

Ambadas Danve : ...मग फडणवीस, गडकरी यांनी विदर्भासाठी काय केले?

Maharashtra Assembly session 2023: अंबादास दानवे यांचा सवाल

संपत देवगिरे- सरकारनामा ब्युरो

Nagpur News: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भाच्या प्रश्नावर भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. विदर्भाच्या विकास या विषयावर प्रस्ताव आणणाऱ्या सदस्यांची दानवे यांनी कडक शब्दात कानउघडणी केली. राज्यात व केंद्रात तुम्ही सत्तेत आहात. तरीही विदर्भाचा विकास झाला नाही म्हणता, मग देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांनी केले तरी काय? असा प्रश्न दानवे यांनी केला आहे.

विदर्भाच्या प्रश्नावर विकासाचा आव आणायचा आणि कृती काहीच नाही, हे सत्ताधारी पक्षच म्हणतो. गेली पाच वर्षे सत्तेत असताना तुम्ही काहीही केलेले नाही. जनतेच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम तुमच्याकडे नाही, याचीच ही कबुली आहे. भाजपवाले म्हणतात, विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही, तर लोक काय म्हणतील, माध्यमे काय म्हणतील यावर टीका करताना दानवे म्हणाले, वर्तमानपत्र काय म्हणते, त्यांना दाखवण्यासाठी विदर्भाची चर्चा करू नका. खरोखरच विदर्भाच्या विकासासाठी, जनतेसाठी काम केले पाहिजे. त्यात तोंडदेखलेपणा नको.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दानवे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी यांनी काय केले हे तुम्ही सांगत बसता, मग का विदर्भाचा विकास का झाला नाही. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या येथेच का होतात. येथील उद्योगाचा अनुशेष का भरून निघाला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटत नाही, असे प्रश्न उपस्थित करत दानवे यांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले.

नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघतत चालली आहे. महिला अत्याचार सर्वाधिक नागपूरमध्ये आहेत. सर्वात जास्त खून येथे होतात. ड्रग्ज देखील येथेच विकले जाते. नागपूरची तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहेत. गृहमंत्री नागपूरचे आहेत, याचे काय उत्तर द्याल? शहरातील बिघडलेल्या आरोग्यव्यवस्थेचा पाढा देखील दानवे यांनी वाचला. नागपूर विदर्भात नाही का?. गेल्या सहा महिन्यांतील मृत्यूंची संख्या पाहिली तर अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचे दानवे म्हणाले.

(Edited By - Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT