Devendra Fadnavis reaction Nagpur : पार्थ पवार यांच्या जमिनी प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. विरोधकांमार्फत चौफेर आरोप त्यांच्यावर केले जात आहे. हा जमिनीची व्यवहार सध्या रद्द करण्यात आला आहे. मात्र आरोपांच्या फैरी सुरूच आहे.
यावर मुख्यमंत्री काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच अजित पवार यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. जमीन घोटाळा प्रकरणामुळे ही भेट त्यांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या भेटीमागचे कारण सांगितले. ते म्हणाले, राज्यात सध्या बिबट्यांची दहशत चांगलीच वाढली आहे, त्यावर दोघांची आपसात चर्चा झाल्याचा दावा केला. बिबट्याच्या वाढत्या दहशतीवर अमित शहा लवकरच बैठक घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस आज एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अजितदादांनी अमित शहा (Amit Shah) यांची घेतलेल्या भेटी ही राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षांनी एकत्रित लढायचे की स्वतंत्र हा त्यांचा प्रश्न आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
यापेक्षा मुंबईच्या जनतेचा विश्वास कोणावर आहे ते महत्त्वाचे आहे. महायुतीवर सर्वाधिक विश्वास मुंबईच्या जनतेचा आहे. जनतेने महायुतीचा महापौर निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोण, कोणाशी, कोणासोबत आणि कशाप्रकारे लढतो हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण न करता राहुल गांधी व शरद पवारांसह सर्व विरोधक उलटसुलट आरोप करीत आहे. जोपर्यंत ते पराभवानंतर आत्मपरीक्षण करीत नाही तोपर्यंत विरोधकांची दुर्दशाच होत राहिल. राहुल गांधींनी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात आम्ही अपयशी ठरलो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शरद पवारांनी पैसे वाटून जिंकल्याचा आरोप केला. खरे तर निवडणुकीत जिंकतो तोच सिकंदर ठरतो. पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी, मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल करता यायला हव्यात तसेच आत्मपरीक्षणही करता आले पाहिजे. परंतु आमच्या विरोधी पक्षाला हे मान्य नाही. या निवडणुकीत खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करण्याची संधी सर्वांना होती. आम्ही आणलेल्या योजना लोकांना आवडल्या, म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिले, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.