AIMIM Bihar government proposal : 'AIMIM'नं बिहारमध्ये रचला खेला; सरकार स्थापनेचा सुचवला पर्याय, नीतीशकुमारांना पंतप्रधानपदाच्या ऑफरसह बरंचं काही...

BJP-NDA Declares Nitish Kumar as 2029 PM Candidate AIMIM Suggests Bihar Govt Option : बिहारमधील नीतीशकुमार यांच्या 'जेडीयू'ला 'AIMIM'ने सरकार स्थापनेचा पर्याय सुचवला आहे.
AIMIM Bihar government proposal
AIMIM Bihar government proposalSarkarnama
Published on
Updated on

AIMIM political strategy Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयूला एनडीएला तब्बल दोनशेच्यावर जागा मिळाल्या आहेत. आता एनडीएमध्ये भाजप 89 जागा मिळून एक, तर जेडीयू 85 जागा मिळवत द्वितीय क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता आहे.

नीतीशकुमार यांच्या जेडीयूकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला. तर भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल, असं सांगितलं जात आहे. यातच असदुद्दीन ओवैसी यांच्या 'AIMIM'कडून जेडीयूला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला आहे. पण यात मुख्यमंत्रीपदावर 'AIMIM'ने दावा सांगितला आहे. तर नीतीशकुमार यांना 2029चे पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. 'AIMIM'च्या या आॅफरमुळे बिहारमध्ये वेगळाच खेला होणार असल्याचा चर्चांना पेव फुटलं आहे.

'AIMIM'ने जेडीयूला प्रस्ताव देताना, हम हमेशा जोड़ने की राजनीति करते हैं, तोड़ने की नहीं। इसीलिए अभी भी मौका है। असे म्हटले आहे. या प्रस्तावात 'AIMIM'ने सत्तेत मुख्यमंत्री पद मागितले आहे. तर 'जेडीयू'ला 2 उपमुख्यमंत्री, 20 मंत्री देणार असल्याचे सुचवलं आहे. सत्ता स्थापने 'आरजेडी', काँग्रेस, डाव्यांना बरोबर घेण्याचं सुचवलं आहे.

'आरजेडी' सहा मंत्री, काँग्रेसला दोन मंत्री, 'CPIML' आणि 'CPIM'ला प्रत्येकी एक मंत्री देण्याचं सुचवलं असून, नीतीशकुमार (Nitish Kumar) यांना 2029ला पंतप्रधानपदाचे उमेदवारीचे सुचवले आहे. 'AIMIM'चा हा प्रस्ताव बिहारमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, सत्ताधारी 'एनडीए' या प्रस्तावाची चांगला जोक आहे, असे म्हणत खिल्ली उडवली आहे. 'जेडीयू'ने 'AIMIM'च्या प्रस्तावावर प्रतिसाद दिलेला नाही.

AIMIM Bihar government proposal
Vote Rigging : मतदानात हेराफेरी, 'CID'कडून एकाला अटक; राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतदारसंघात काय घडलं?

'AIMIM'ने पाच जागा जिंकल्या

बिहारमधील सीमांचल भागामध्ये गेल्या निवडणुकीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत, 'AIMIM'ने यावेळीही करत पुन्हा पाच जागा जिंकल्या. तसेच, दोन जागांवर 'AIMIM'चे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. बिहारचा सीमांचल भाग मुस्लिमबहुल असून, या भागामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी 'AIMIM'कडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते.

AIMIM Bihar government proposal
Bihar Election Result : "फक्त 'एकच' गोष्ट करा, बिहारनंतर नेपाळमध्येही BJP सरकार येईल"; स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरची बोचरी टीका

'AIMIM'मुळे महाआघाडीच्या उमेदवारांना धक्का

2015मध्ये झालेल्या निवडणुकीत किसनगंजच्या जागेवर 'AIMIM'चा उमेदवार विजयी झाला होता. तर, 2020मध्ये या भागातील पाच जागांवर 'AIMIM'चे उमेदवार विजयी झाले होते, तर अनेक जागांवर 'AIMIM'ला मिळालेल्या मतांमुळे महाआघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता.

महाआघाडीने 'AIMIM'चे आमदार पळवले

मात्र, 2022मध्ये 'AIMIM'च्या पाचपैकी चार आमदारांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत 'AIMIM'ची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ‘तुम्ही माझे आमदार पळवू शकता, मतदार नाही,’ असे म्हणत 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाआघाडीवर जोरदार टीका केली होती.

'AIMIM' 29 जागांवर लढले

'AIMIM'ने एकूण 29 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यात सीमांचलातील चार जिल्ह्यांतील 24पैकी 14 जागांचा समावेश होता. यातील आमौर, बहादूरगंज, कोचाधामन, जोकिहाट आणि बैसी या पाच जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com