Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Bawankule:अमित शहा आणि फडणवीस सक्षम आहेत, धमकी देणाऱ्याला हुडकून काढतील

त्या दिवशी शरद पवार, नितीन गडकरीसुद्धा त्या मंचावर होते. या नेत्यांचा गौरव करण्याचा त्यांचा हेतू होता. पण महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) म्हणाले.

Atul Mehere

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी आलेली आहे. या संदर्भातील बातमी थोड्या वेळापूर्वीच बघितली. अशा धमक्यांना आम्ही भीक घातली नाही. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही सक्षम आहेत. त्यामुळे अशी धमकी ज्यांनी दिली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा शोध घेतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. गुजरातमधील प्रचारावरून नागपुरात परत आल्यावर विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपाल ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात (Maharashtra) आले, तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवनेरी किल्ल्यावर ते गेले. शिवरायांच्या बाबतीत जे विषय आतापर्यंत आले, त्यामध्ये त्यांनी संवेदनशिलपणे काम केले आहे. त्यांच्या रोजच्या बोलण्यामध्ये, भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. ज्यांनी कधीही इतिहासाला आणि शिवरायांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपचा कुठलाही कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो. जगात त्यांचे स्थान कमी करू शकत नाहीत. पण ज्या दिवशी राज्यपालांनी ते वक्तव्य केले. त्या दिवशी शरद पवार, नितीन गडकरीसुद्धा त्या मंचावर होते. या नेत्यांचा गौरव करण्याचा त्यांचा हेतू होता. पण महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) म्हणाले.

मी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची पाठराखण अजिबात करत नाहीये. ते बोलले आणि छत्रपती शिवाची महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा हेतू असेल तर ते चुकीचेच आहे. त्यांचे समर्थन कुणीच करणार नाही, असेही ते म्हणाले. राज्यातील राजकीय स्थिती गोंधळलेली आहे. उद्या काहीही होऊ शकतं. त्यावर दोन महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असे संजय राऊत म्हणाले. याबाबत बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, राजकीय वादांत न पडता विकासाची कामे करू, असे दानवेंनी म्हटले आहे. राजकारणात उद्या काय होईल, हे कुणालाही सांगता येत नाही. नुकतेच आपण पाहिले की, उद्धव ठाकरेंच्या हुकूमशाहीला कंटाळून त्यांचे ५० आमदार बाहेर पडले आणि त्यांचे सरकार पडले. पण हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.

सद्यःस्थितीत आमचे संख्याबळ १६४ आहे आणि आगामी काळात ते १८४ होईल. त्यामुळे संजय राऊतांना आता यावर अधिक काही बोलू नये. आमचे सरकार स्थिर आहे. सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही. उलट दररोज आमचे संख्याबळ वाढत चालले आहे. नवनवीन प्रवेश आमच्याकडे होत आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना ५००च्या वर लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतले. यामध्ये जिल्हा परिषद पातळीवरच्या नेते, काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा समावेश आहे. आमचे सरकार दररोज चांगले निर्णय घेत आहे आणि जनतेला दिलासा देत आहे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT