Amit Shah Sarkarnama
विदर्भ

Amit Shah News : 'हा' आहे अमित शाह यांचा विजयाचा कानमंत्र!

Rajesh Charpe

Nagpur News : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने दुःखी होण्याचे कारण नाही. एवढी वाईट स्थिती आपली नाही. केंद्रात आपलीच सत्ता आणि पंतप्रधान असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) यांनी फक्त 10 टक्के मतांचा टक्का वाढवा विजय आपलाच असल्याचा कानमंत्र दिला. विदर्भातील कार्यकर्ता संवाद बैठकीत दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत विदर्भातील कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला. निवडणूक जिंकण्यासाठी नुसता जोश नको तर होशही हवा आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

अमित शाह म्हणाले, विदर्भात यापूर्वी भाजपने 42 जागा जिंकल्या होत्या. विदर्भात जिंकल्याशिवाय राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार कोणाचा हा किंतु-परंतु मनातून काढून टाका. महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला भाजपचा समजा. कारण आपले लक्ष काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखण्याचे आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने बुथवाईज नियोजन केले आहेत. त्याची ए.बी.सी. अशी श्रेणी केली आहे. त्या सर्व बूथवर 10 टक्के मते वाढवल्यास भाजपला कोणी पराभूत करू शकणार नाही असाही दावा यावेळी शहा यांनी केला.

लाभार्थ्यांच्या घरी, बूथ बैठकांना सुरुवात करा, आपल्यातील मतभेद दूर सारा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या, विजया दशमी ते दीपावली या दरम्यान, भाजपचा झेंडा हाती घेऊन स्कूटर रॅली काढा. महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीतील पराभूतांसोबत संपर्क करा, विरोधकांच्या बूथ कमेटी सदस्यांनाही आपल्याकडे वळवा, व्हाटस ॲप ग्रुप स्थापन करा अशा सूचना अमित शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.

'आघाडीला रोखणं आपलं काम...'

आप आपसांतील भांडणे, हेवे-दाव्यांमुळे आपले काही भले होणार नाही. आपले लक्ष्य महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखणे आणि महायुतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याचे आहे. सर्वांना तिकीट देता येणार नाही. माझेही तिकीट एकेकाळी कापण्यात आले होते. त्यामुळे तुमचे दुःख मी समजू शकतो. शेवटी पक्ष महत्त्वाचा असतो. त्यामुळे राजी-नाराजी, मतभेदांपासून दूर राहण्याचा सल्ला अमित शाह यांनी दिला.

महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांना मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्यापासून ओळखतो. ज्या राज्याची निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर दिली. ते राज्य आपण जिंकलो आहोत, असे यावेळी अमित शाह यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT