Ashish Shelar Taunt Opponents : 'ठोकलं अक्षय शिंदेला अन् एन्काऊंटर विरोधकांचा?' ; शेलारांनी लगावला टोला!

Ashish Shelar on Akshay Shinde Encounter : आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचे का? असा सवालही केला आहे.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Akshay Shinde Encounter and Maharashtra Politics : 'काल अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एनकाऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय. हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची बरसी करता तशी आता अक्षय शिंदेची पण बरसी करणार का?' असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी विरोधकांना केला आहे. बदलापूर प्रकरणाती आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या घटनेवर आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेवर बोलताना शेलारांनी वरील विधान केलं.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार(Ashish Shelar) प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले की, विरोधकांची काय वक्तव्य आहेत? काय सांगत आहात? काय संदेश आहे? काय अर्थ काढायचा ? थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट करताय? काय सांगायचे आहे तुम्हाला? पोलिसांनी गोळ्या खायच्या काय? त्या पीडित बच्चूची मानसिकता तरी समजून घ्या.

Ashish Shelar
Amit Thackeray : ''...तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला... पुरा’ होईल'' ; अक्षय शिंदे एन्काऊंटरवर अमित ठाकरेंचं विधान!

तसेच, 'त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात? त्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबाबत, तो झाला की नाही? पोलिसांनी काही नाही केले? या सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे काय? कुठल्या थराला गेला तुम्ही? याचे राजकारण करता की तो अक्षय शिंदे, गुन्हेगार तो लिंगपिसासू त्याची माळ हे जपत आहात? असा थेट सवाल करीत तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू.' अशा शब्दांत शेलार यांनी हल्लाबोल केला.

याशिवाय 'शरद पवार(Sharad Pawar) साहेब तुम्ही काय बोलत आहात? हलगर्जीपणा? आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचे का? पोलिसांच्या बंदुकीचा जो हात घालेल, त्याला ठोकयलाच पाहिजे. आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या पाठिशी आहोत. उबाठा गट आता ज्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकले, त्या अधिकाऱ्याला आता काय जोडे मारो करणार काय?' असा खोचक सवालही शेलार यांनी केला.

Ashish Shelar
Varsha Gaikwad : 'स्वसंरक्षण की हत्या?' ; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वर्षा गायकवाडांचा पोलिसांना सवाल!

तसेच ते म्हणाले की, 'महाविकास आघाडीला सवयच लागली आहे, दहशतवादी, गुन्हेगार असेल त्याला ठोकला की त्याचे फोटो घ्यायचे व गळा काढायचा. अफझल गुरुची बरसी केलीत, उद्या अक्षय शिंदेची बरसी करतील. कुठे आहेत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)? त्या लिंगपिसासू विरोधात बोलताना का जीभ अडकत आहे यांची ? आदित्य ठाकरे आज ट्विट करीत आहेत.

मग त्यांच्याकडे माहिती होती तर ते पोलिसांत का गेले नाहीत? त्यांनी हे कर्तव्य का नाही केले? नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे का गेले नाहीत? विरोधकांवर शहरी नक्षलवादाचा प्रभाव आहे, त्यांच्यासाठी ईडी चुकीचे, पंतप्रधान व मुख्यमंत्री चुकीचे, वातावरण असे निर्माण करायचे की या देशात कायदाच नाही. असं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

याचबरोबर 'अक्षय शिंदेने बंदुक घेतली तर या पोलिसांनी काय करायचे होते? बरं ज्याला ठोकला तो कोण आहे ? चिमुरडीसोबत जो प्रकार केला त्या कुटुंबाची काय मानसिक अवस्था असेल? पोलीस आणि तपास यंत्रणासमोर त्यांची साक्ष झाली आहे. काही पुरावे गोळा केले गेलेत, आज ते सगळे खोटे ठरवताय? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com