Sandeep Deshpande | Amol Mitkari Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari : संदीप देशपांडे पळपुटे, त्यांच्यात मस्ती किती बघतो; मिटकरींनी थोपटले दंड

Amol Mitkari Vs Sandeep Deshpande : देशपांडे यांच्यासारख्या पळपुट्या लोकांवर मी बोलावं इतके वाईट दिवस माझ्यावर आले नाहीत, अशी खिल्ली मिटकरींनी उडवली आहे.

Akshay Sabale

Maharashtra Political News : आपली लायकी काय आपण बोलतो काय? दुर्दैवानं आमच्या कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. यावर अमोल मिटकरी यांनी नीच राजकारण करू नये, अशा शब्दांत मनसे नेते, संदीप देशपांडे यांनी फटकारलं होतं. याला, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड प्रत्युतर दिलं आहे.

"देशपांडे यांची लायकी महिला पोलिस कर्मचाऱ्यानं दाखवून दिली आहे. देशपांडे यांच्यासारखी नीच वृत्ती अकोला जिल्ह्यात जन्माला आली आहे. अशा वात्रट लोकांमुळे पक्ष डबघाईस येत आहे," असा हल्लाबोल मिटकरींनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, "एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करण्याचे संस्कार संदीप देशपांडेंना आहेत, तसे मला नाहीत. देशपांडे यांची लायकी महिला पोलिस कर्मचाऱ्यानं दाखवून दिली आहे. शेवटी देशपांडे हात फॅक्चर करून पळून गेले होते. देशपांडे यांच्यासारखी नीच वृत्ती अकोला जिल्ह्यात जन्माला आली आहे. अशा वात्रट लोकांमुळे पक्ष डबघाईस येत आहे."

"देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांच्यासारख्या पळपुट्या लोकांवर मी बोलावं इतके वाईट दिवस माझ्यावर आले नाहीत. शेवटी थोबाड चालविल्याशिवाय त्यांचा मालक भीक टाकत नाही. त्यामुळे त्यांना थोबाड चालवुद्या. किती थोबाड चालवतात ते बघतो. त्यांच्यात किती मस्ती आहे, हे दाखवावी," असं आव्हान अमोल मिटकरींनी देशपांडेंना दिलं आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले होते?

"आपली लायकी काय आपण बोलतो काय? दुर्दैवानं आमच्या 28 वर्षांच्या कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. यावर अमोल मिटकरी यांनी नीच राजकारण करू नये. अमोल मिटकरी इतके नीच राजकारणी असतील, असं वाटलं नव्हतं," अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT