Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama

Amol Mitkari : चाकू, गुप्त्या अन्...; मिटकरींनी सांगितली मनसैनिकांच्या हल्ल्यामागची A टू Z स्टोरी

Amol Mitkari On MNS : अमोल मिटकरी म्हणाले, मी विश्रामगृहाबाहेर आलो असतो, तर मोठा राडा झाला असता. अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. पण...
Published on

MNS News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या कारची मंगळवारी अकोला येथील शासकीय विश्रामगृह परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली. या घटनेबाबत आमदार मिटकरी यांनी केलेल्या तक्रारीवरून तोडफोड करणाऱ्या 13 मनसैनिकांवर सिव्हिल लाईन्स पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पण, तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांवर अमोल मिटकरी यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्या घरावर हल्ला करत ते पेटवून देण्याचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी मनसैनिकांवर केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"घरावर हल्ला करण्याचा डाव"

अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) म्हणाले, "अमरावतीतून कर्णबाळा दुनबळे नावाचा मनसेचा नेता अकोल्यात आला होता. त्यानं पत्रकारांशी अनौपचारिक पद्धतीनं बोलताना सांगितलं की, 'आम्ही मिटकरींच्या घरावर हल्ला करणार आहोत.' माझ्या घरावर हल्ला करण्याचा मनसेच्या कार्यकर्त्यांचा डाव होता. मात्र, मी शासकीय विश्रामगृहात असल्याचं कर्णबाळा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कुणीतरी कळवलं. नंतर कर्णबाळा आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी चिथावणी दिल्यानं 50 जणांचा टोळका हातात दगड आणि कुंड्या घेऊन विश्रामगृह येथे आला."

"कारवर दगडे मारली अन् कुंड्या फेकल्या"

"मी विश्रामगृहातील गुलमोहर कक्षात बसलो होतो, हे मनसैनिकांना माहिती नव्हतं. माझा कारमध्ये बसल्याचं हे त्यांना कळलं. त्यांनी एका महिलेला पुढे करून कारवर दगडे मारली. कुंड्या फेकण्यात आल्या. मी कारमध्ये नसल्याचं पाहून सर्वजण गुलमोहर कक्षात गोंधळ घालत आले. मात्र, तिथे असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांचा प्रतिकार केला," असं मिटकरींनी म्हटलं.

Amol Mitkari
Amol Mitkari News : ...अखेर अमोल मिटकरींनी मोठं पाऊल उचललंच; गाडीच्या तोडफोडप्रकरणी राज ठाकरेंचं नाव घेत पोलिसांत तक्रार दाखल

"मारून टाकण्याची धमकी"

"नंतर अर्धा तास माझ्या आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली. बाहेर निघाल्यावर तुला मारू टाकू, अशा धमक्याही देण्यात आल्या. अत्यंत हिस्त्र शस्त्रे त्यांच्याकडे होती. चाकू आणि अॅसिडने हल्ला करण्याचा त्यांचा विचार होता.

माझ्या घरावर हल्ला करण्याचा मोठा कट रचण्यात आला. बीडमध्ये प्रकाशदादा सोळुंके यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रमाणे माझे घर पेटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, मी घराबाहेर पडल्यानं कुटुंबावरील संकट टळून माझ्यावर ओढावलं. तसेच, मी कारमध्ये नसल्यानं सुरक्षित राहिलो. मनसैनिकांनी पायत गुप्त्या आणि हत्यारे लपवून ठेवली होती," असा दावा मिटकरींनी केला आहे.

Amol Mitkari
MNS Jai Malokar Death News : अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू!

"आमचे हात बांधलेले नाहीत"

"भ्याड हल्ला करून सुपारीबाजांना मर्दुमकी गाजवली असे वाटत असेल. मात्र, आमचे हात बांधलेले नाहीत. आम्ही सुद्धा 'ईट का जवाब पत्थर से' देऊ शकतो. मी विश्रामगृहाबाहेर आलो असतो, तर मोठा राडा झाला असता. अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. पण, मी प्रचंड संयम ठेवला," असं मिटकरींनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com