अकोला : राज्यातील सत्तास्थापनेतील नाट्यमय घडामोडींच्या दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा कोण करणार, याविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आता विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून यंदा विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस करतील हे दाखवलं होतं. परंतु आता विठ्ठलानं एकनाथाला बोलावलं, अन् ते पूजा करणार आहे.
अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. 'शासकीय पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचं सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे, कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनवाणीतं ते आमदार अपात्र ठरल्यास, मग सर्व काही समोर येणार. मात्र देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे. असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
त्यामुळे आता आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर द्यावं, सरकार नेमकं आहे कोणाचं भाजप की शिवसेना, भाजपचं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस का नाही, नसेल तर शिवसेनेचं आहे हे स्वीकारा. अशी मिश्लिल टिप्पणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे सरकार हे पाच वर्षे टिकेल, अन् भलेही अंतर्गत कलह-गटबाजी असेल पण आजही एकनाथ शिंदे हे एक शिवसैनिक म्हणून प्रत्येकाला आठवतात. अन् ते पुजा करणार आहे. अगोदरच या संदर्भात भाकीत केलं होतं की भाजपचा मुख्यमंत्री पूजा करणार नाही, आज ते खर ठरलं. असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारतीय कुस्ती परिषद संघटेनेने महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयावरही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भारतीय कुस्तीगीर संघटना जरी स्वायत्त असली तरी तिच्यावर भाजपचे दडपण आहे. संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी शरद पवार यांच्याबाबत सन्मानाची भावना व्यक्त केली होती, तेच त्यांना खटकलं. शरद पवार यांना गुरु मानले, हे भाजपला पाहवल गेलं नाही, म्हणून कुस्तीगीर परिषदेवर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. दबावतंत्राचा वापर करुन दिल्लीत झालेल्या परिषदेच्या बैठकीत थातूर मातूर कारणे देऊन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. यामागे भाजपचं राजकारण आहे. सुडाच्या भावनेने राज्य कुस्तीगीर परिषदेवर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.