‘शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात’; ‘मातोश्री’वरील बैठकीस तिघांची दांडी

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीस तीन खासदारांची अनुपस्थिती
Shivsena
Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : शिवसेनेतील (shivsena) आमदारांचे बंड आता खासदारपर्यंत (MP) पोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या बैठकीला तीन खासदारांनी दांडी मारली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेचे तब्बल ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने केला आहे. त्यामुळे आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बैठकीतील बहुतांश खासदारांनी एकनाथ शिंदेंशी जुळवून घेत भाजपबरोबर युती करावी, असे मत मांडले. (Absence of three MPs in the meeting convened by Uddhav Thackeray)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली झाली. ईडीकडून चौकशी सुरू असल्याने संजय राऊत या बैठकीला उपस्थित नव्हते. याशिवाय, भावनी गवळी, श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे हे तीन खासदार बैठकीस अनुपस्थित होते. यातील विचारे हे केदारनाथला गेल्याचे सांगण्यात आले. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असल्याने ते गैरहजर राहणे साहजिक आहे. मात्र, गवळी आणि विचारे यांच्या दांडीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. गवळी यांनीही भाजपशी जुळवून घ्यावे, असे यापूर्वीच सांगितले होते. त्यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे.

Shivsena
संजय राऊतांनी फडणवीसांच्या जखमेवर चोळले मीठ : म्हणाले...

दरम्यान, बैठकीतील बहुतांश खासदारांनी एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्यावे. तसेच, शिवसेना-भाजप युतीचा विचार करावी, अशी विनंती केली. यामध्ये ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर हेही सामील होत, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे एका केंद्रीय मंत्र्याने सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचे खासदार मतदान करतील, असेही भाजपकडून बोलले जात आहे.

Shivsena
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : आघाडीचा उमेदवार ठरला ; नार्वेकर विरुद्ध साळवी सामना रंगणार

यासंदर्भात लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या संसदीय पक्षावर राज्यातील घडामोडींचा काहीही परिणाम होणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी पक्षाचे सर्वच खासदार एकजुटीने उभे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com