Amol Mitkari Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari on BJP : मी फक्त सामान्य अकोलेकरांची भावना बोलून दाखवली, त्यात एवढे चिडायचे काय कारण?

सरकारनामा ब्यूरो

Just expressed the feelings of Akolekars : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी आजारी असलेले खासदार संजय धोत्रे यांच्यावर टीका करणारे ट्विट केले होते. त्यावर भाजपने पलटवार केला. या पलटवारालाही आमदार मिटकरी यांनी संयमी आणि मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे.

यासंदर्भात आज (ता. ११) ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार मिटकरी म्हणाले, भाजपच्या एका सचिवाने पत्रक काढून जे काही आरोप आणि मागणी केली, ती हास्यास्पद आहे. खासदार धोत्रे आजारी आहेत, हे मलासुद्धा माहिती आहे. मी ‘त्या’ ट्विटमध्ये केवळ सामान्य अकोलेकरांची भावना बोलून दाखवली.

ट्विटमध्ये मी असं म्हणालो होतो की, गेल्या चार वर्षांमध्ये अकोला जिल्ह्यातील कुठलेही प्रश्‍न संसदेमध्ये आलेले नाहीत. हा करंटेपणा म्हणावा की, आमचे दुर्दैव आणि हे खरे आहे. अकोलेकर म्हणून सामान्य लोकांच्या भावनांना वाचा फोडणे हे माझे काम आहे. याव्यतिरिक्त मी काहीही त्या ट्विटमध्ये लिहिलेले नाही, असे आमदार मिटकरी म्हणाले.

‘त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपाचे आमदार मिटकरींनी आधी उत्तर द्यावे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मिटकरींना संसदीय कामकाजाचा किती अभ्यास आहे, हेदेखील कळले, असा टोला भाजप सचिवाने लावला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी उपरोक्त उत्तर दिले आहे.

अकोलेकर म्हणून भाजपचा (BJP) कुणी आमदार किंवा मोठ्या पदाधिकाऱ्याने माझ्या ट्विटवर उत्तर देणे, आक्षेप घेणे, समजले जाऊ शकते. पण एका सचिवाने अशा प्रकारचे पत्रक काढून निव्वळ आगपाखड करणे योग्य नाही. कारण मी जे मत मांडले, ते आज अकोला (Akola) जिल्ह्यातील जनतेचे मत आहे. त्यामुळे मी कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असेही आमदार मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT