Amol Mitkari, Ajit Pawar
Amol Mitkari, Ajit Pawarsarkarnama

Amol Mitkari News : मिटकरींच्या ट्विटमुळे शिंदे गटाची उडाली झोप...

Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Published on

Amol Mitkari News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर अजितदादांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगूनही सर्वत्र बॅनर्स, पोस्टर्स लागले आहेत. या बॅनर्सची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची झोप उडाली आहे.

अजित पवार Ajit Pawar यांचा वाढदिवस असल्याने अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाोबतच त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व, असे श्री. मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे तीन पक्षांचे सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शिंदे गटाचे सर्वच नेते आगामी निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सांगत आहेत.

तर एकनाथ शिंदे हेच 2024 नंतरही मुख्यमंत्री असतील असे शिंदे गटाचे नेते सांगत आहेत. असे असताना अमोल मिटकरी यांनी ट्विट करून नव्या वादाला फोडणी दिली आहे. मिटकरी यांनी हे ट्विट करून शिंदे गटाची झोप उडवली आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय वर्तुळात फक्त मिटकरी यांच्या ट्विटचीच चर्चा आहे.

Amol Mitkari, Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणारच ! संजय राऊतांचा 'बाँब'

मिटकरी यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात अजित पवार यांची भाषणे दाखवण्यात आली आहेत. अजित पवार यांचे सभा, संमेलानातील व्हिडीओ दाखवण्यात आले आहे. तसेच अजितदादा यांना संघर्ष योद्धा संबोधत त्यांना निडर नेतृत्व आणि करारी व्यक्तीमत्त्वही म्हटलं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com