Angnwadi Sewika Sarkarnama
विदर्भ

Amravati Angnwadi : अमरावतीतील 2500 अंगणवाडी सेविका संपावर, तीन निलंबित; काय आहे कारण ?

सरकारनामा ब्यूरो

अमर घटारे

Amravati District News : अमरावती जिल्ह्यात 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. परिणामी जिल्ह्यातील तब्बल 2500 पेक्षा अधिक अंगणवाडींना कुलूप लागले आहे. महिन्यापासून सुरू असलेल्या या अंगणवाडी सेविकांचा संपाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधण्यासाठी सोमवारी अमरावती जिल्हा परिषदेबाहेर सरकारविरोधी निदर्शने केली.

आम्हाला मानधन नको तर अंगणवाडी सेविकांना दरमहा 26 हजार रुपये आणि मदतनिसला २० हजार रुपये द्यावे व शासकीय कर्म दर्जा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. त्या संपाला अमरावतीतील अंगणवाडी सेविकांनी पाठिंबा दिला आहे.

अमरावती (Amravati) जिल्हा परिषदेच्या बाहेर चार अंगणवाडी सेविकांनी मुंबई येथे असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत साखळी उपोषण सुरू केले होते. त्या चारही अंगणवाडी सेविकांना निलंबनाच्या नोटीस दिल्या आहेत. तर इतर सर्व अंगणवाडी सेविकांना ताबडतोब कामावर रुजू होण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले . नोटीस देऊनही एकाही अंगणवाडी सेविका कामावर रुजू झालेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच माता मृत्यू, बालमृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यांना चांगला आहार मिळावा व बालकांना दररोज पोषण आहार मिळावा, यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करत असते. मात्र एका महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र बंद असल्याचा परिणाम मेळघाट आदिवासी बहुल भागावर झाला आहे. तेथील संपूर्ण अंगणवाडी केंद्र बंद असल्याने तेथील शालेय पोषण आहार बंद असल्याचने बालकांचे हाल होत आहेत.

अमरावती जिल्हा परिषदेच्या गेटवर सोमवारी या सर्व अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या प्रमुख तीन मागण्या सरकारने मान्य कराव्यात. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहणार आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सरकारविरोधी मतदान करू, असा इशाराही यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

SCROLL FOR NEXT